अनेकवेळा भरपूर खाल्ल्यानंतर सुद्धा पोट भरतं पण मन भरल्यासारखं वाटत नाही, आपण अनेकवेळा म्हणतो सुद्धा की माझं पोट भरलंय पण मन नाही. कधी विचार केला आहे का मन आणि भुकेचा काय संबंध? आपण पोट भरण्यासाठी खातो ना, मग त्याचा मनाशी कसा काय संबंध असू शकतो? कदाचित तुम्हाला कोणी याचं उत्तर सुद्धा दिलेलं नसेल पण आज आम्ही तुम्हाला या वाक्याचा अर्थ उलघडून सांगणार आहोत.
भूक आणि मन यांच्यामध्ये नेमका काय संबंध आहे हे जाणून घेऊया. लक्ष्यात घ्या जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा आपलं शरीर आपल्याला संकेत देत असतं की आपल्याला अन्नाची किंवा एनर्जीची गरज आहे. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा आपल्याला फक्त खाण्याची इच्छा होते ते आपल्या मनाशी जास्ती संबंधीत आहे. अनेकवेळा काय होतं आपल्याला राग आलेला असतो किंवा दुःख झालेलं असतं आणि त्यातून बाहेर पाडण्यासाठी किंवा थोडं आनंदी वाटावं म्हणून आपण खाण्याकडे वळतो.
अधिक प्रोसेस्ड अन्न खात असाल तरी देखील तुमच्या खाण्याच्या इच्छेवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. याशिवाय काही शरोराच्या संबंधित समस्या सुद्धा तुमच्या भुकेचं प्रमाण वाढवू शकतात. तुम्हाला जर का पोटाचे आजार असतील किंवा काही औषधं घेत असाल तर भुकेचं प्रमाण वाढू शकतं आणि भूक भागात नसल्याची समस्या निर्माण होऊ शकते.
एक लक्षात घ्या सतत खाणं हे तुमच्या शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे डायबिटीज, हृदयाचे आजार किंवा लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. मग यावर उपाय म्हणून काय कराल? पाहिलं म्हणजे तुमच्या डॉक्टरला भेटा, कुठल्याही प्रकारचे प्रयोग करण्यापेक्षा थेट वैद्यकीय सल्ला घेतलेला कधीही चांगला असतो. याशिवाय तुमच्या दैनंदीन आहारात फळ-भाजी यांचा समतोल असुद्या. दिवसभर लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर घालवत असाल तर काहीवेळ व्यायाम, प्राणायाम नक्कीच करा आणि सर्वात महत्वाचं आठ तासांची झोप महत्वाची आहे हे लक्षात घ्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.