Healthy Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: 'या' कारणांमुळे मुलांना ब्रोकोली अन् कोबी आवडत नाही

ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात 6 ते 8 वयोगटातील मुलांचा समावेश केला. ज्यामध्ये त्यांनी शोधले की मुले ब्रोकोली, फ्लॉवर किंवा हिरव्या भाज्या का आवडत नाही.

दैनिक गोमन्तक

Healthy Tips: काही मुलांना हिरव्या भाज्या खाण्यास आवडत नाही. पौष्टिकतेने समृद्ध हिरव्या भाज्या ताटात आल्यावर ते त्यांचे तुकडे करू लागतात. ते उपाशी राहतात पण जेवण करत नाहीत. 

यामुळे बहुतांश पालकही त्रस्त होतात. मुले हिरव्या भाज्या का खात नाहीत आता शास्त्रज्ञाला याचे कारण सापडले आहे. चला जाणून घेऊया ब्रोकोली, कोबी यासारख्या हिरव्या भाज्या मुलं का खात नाहीत.

  • मुले ब्रोकोली आणि कोबी का खात नाहीत 

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, जर एखाद्या लहान मुलगा हिरवी भाजी खात नसेल तर त्यामागे त्यांच्या तोंडात केमिकल असतात. जेव्हा लहान मूल ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी किंवा स्प्राउट्स यासारख्या गोष्टी खातात, तेव्हा या भाज्यांमधून एंजाइम बाहेर पडतात. जे मुलाच्या तोंडात असलेल्या बॅक्टेरियावर रिएक्ट करु लागतात.

यामुळे सल्फरची रिएक्शन वाढते आणि मुलांच्या तोंडात दुर्गंधी निर्माण होते. या दुर्गंधीमुळे मुले ब्रोकोली, कोबी यांसारख्या भाज्या खाण्यास टाळाटाळ करू लागतात.  मुलांप्रमाणेच पालकांच्या तोंडातूनही तेच एंजाइन बाहेर पडतं, पण त्यांना हा वास येत नाही. कारण त्यांना त्याची सवय झालेली असते.

  • शास्त्रज्ञ काय म्हणतात

कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन , कॅनबेरा, ऑस्ट्रेलियाचे प्रमुख डॅमियन फ्रँक यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये लाळेतून बाहेर पडणाऱ्या सल्फरची क्रिया लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये सारखीच असते की वेगळी असते याची तपासणी करण्यात आली. या अभ्यासात असे आढळून आले की ब्रोकोली किंवा फुलकोबीची चव त्यातून बाहेर पडणाऱ्या एंजाइनच्या पातळीवर अवलंबून असते. 

  • मुलांना हिरव्या भाज्या का आवडत नाहीत

डॉ. फ्रँक यांच्या मते, अन्न आवडणे किंवा नापसंत करणे हे आपल्या सर्वांमध्ये जन्मापासूनच असते. मुलांना अनेकदा गोड पदार्थ आवडतात, पण जेव्हा ते मोठे होऊ लागतात तेव्हा ते मिठाईपासून अंतर ठेवू लागतात. 

काही लोकांच्या लाळेमध्ये नैसर्गिकरित्या जीवाणू आढळतात. हे तोंडी पोकळीमध्ये सल्फरचे उत्पादन सक्रिय करू शकते. हे चव आणि वास दोन्ही प्रभावित करू शकते. या अभ्यासात असे आढळून आले की मुलांमध्ये सल्फरची क्रिया जितकी जास्त होती तितकीच त्यांना ब्रोकोली आणि फुलकोबी आवडत नाही. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT