Health Tip: Learn the difference between sweet corn and dasi corn Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tip: जाणून घ्या स्वीट कॉर्न आणि मक्याच्या कणीसामधील फरक

मक्याच्या कणीसामध्ये पोषक तत्वे (Nutrients) मुबलक प्रमाणात असतात.

दैनिक गोमन्तक

पाऊस आणि मक्याचं भाजलेल कणीस यात एक विशेष नातं आहे. पावसाळ्यात बहुतेक लोकांना मक्याचं भाजलेल कणीस खायला आवडते. या दिवसांमध्ये भाजलेल्या कणीसावर लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करून खाण्याचा आनंदच वेगळा असतो. ज्यांना मक्याचं भाजलेले कणीस आवडत नाही, त्यांच्यासाठी स्वीट कॉर्न (Sweet Corn) हा उत्तम पर्याय आहे. स्वीट कॉर्न असो किंवा मक्याचं भाजलेल कणीस दोघांचीही वेगळी चव आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्वीट कॉर्न (Sweet Corn) म्हणजेच गोड मक्याची लागवड केली जाते. त्यामुळे तोही बाजारात (Market) विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्वीट कॉर्न (Sweet Corn) आणि मक्याच कणीस दिसायला जरी सारखे असले तरी त्यांचे गुणधर्म वेगळी आहेत. मक्याच्या कणीसामध्ये 96 टक्के कॅलरीज, 100 ग्रॅम उकडलेल्या कॉर्नमध्ये 73 पाणी, कार्बोहायड्रेट्स 21 ग्रॅम, प्रथिने 3.4 ग्रॅम, फायबर 2.4 ग्रॅम, फॅट 1.5 ग्रॅम असतात तर स्वीट कॉर्नमध्ये (Sweet Corn) साखरेचे प्रमाण अधिक असून ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते.

* स्वीट कॉर्न आणि मक्याच्या कणीसांमधील फरक

मक्याच्या कणीसामध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. परंतु आपल्या शिजवण्याच्या पद्धतीने त्यातील पौष्टिक घटक कमी होऊ शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते, स्वीट कॉर्न (Sweet Corn) हे हायब्रीड सिड आहे. यात पोषक तत्वे कमी असून साखरेचे प्रमाण अधिक असते. याशिवाय फायबरचे प्रमाण देखील कमी असते. तर मक्याच्या कणीसामध्ये फायबर आणि पोषक तत्वांचे प्रमाण अधिक असते. यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. यामुळेच स्वीट कॉर्नपेक्षा मक्याच कणीस आरोग्यासाठी (Health)चांगले आहे.

* मक्याचं कणीस खाण्याचे फायदे

मक्याच कणीस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये कॅरोटीनोईड्स, झेक्सॅन्थिन आणि ल्यूटिन सारख्या अँटी-ऑक्सिडंट्स असतात. यामुळे आपल्या डोळ्यांचे आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. तसेच लहान मुलांच्या मानसिक विकास होण्यास मदत करते. म्हणून मक्याच्या कणीसाचे सेवन करणे गरजेचे आहे.

* मक्याचं कणीस खाण्याचे तोटे

कोणत्याही पदार्थाचे अति सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. मक्याच्या कणीसामध्ये काही प्रमाणात फायटीक ॲसिड असते. यामुळे शरीरातील लोह आणि जस्त यासारख्या घटकांचे शोषण करते. मक्याच्या कणीसाचे अधिक सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT