आपल्यापैकी अनेक लोकांची सकाळ (Morning) ही चहा (Tea) किंवा कॉफीशिवाय (Coffee) होत नाही. चहा हा घरी आलेल्या पाहुण्यांना देण्यापासून तसेच ऑफिसच्या (Office) सुट्टीतसुद्धा अनेकदा चहा (Tea) पिला जातो. पण चहा प्यायल्याचे अनेक तोटे आहेत. तज्ञांच्या मते, चहा खूप वेळ उकळल्यास आरोग्याला (Health) हानी पोहोचू शकते. मात्र, चहा (Tea) घेतांना काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपल्याला फायदा (Benefit) होऊ शकतो.
* रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे
तुम्हाला माहिती असेल की रिकाम्या पोटी चहा (Tea) प्यायल्यास ॲसिडीची समस्या निर्माण होऊ शकते. सकाळी चहा पितांना त्यासोबत ब्रेड किंवा बिस्किटे खावीत.
* चहाच्या पानांची गुणवत्ता महत्वाची
चहा (Tea) खरेदी करतांना चहाच्या पानांची गुणवत्ता पाहूनच खरेदी करावा. चहाची चांगल्या पानांमुळे चहाची चव वाढून वाढून आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
* चहा जास्त वेळ उकळू नये
जास्त वेळ चहा (Tea) उकळल्याने चहा आंबट होण्याची शक्यता असते. चहा उकळल्यानंतर गूळ किंवा साखर घालावी.
* जास्त गोड चहा पिणे टाळावे
काही लोकांना खूप गोड चहा (Tea) पिण्याची आवड असते. जास्त गोड चहा प्यायलल्याने अनेक आजार उद्भवू शकतात. म्हणून आरोग्य तज्ञसुद्धा कमी साखरेचा चहा पिण्याचा सल्ला देतात.
* चहात दुधाचे प्रमाण कमी असावे
चहा (Tea) तयार करतांना दुधाचा कमी वापर करावा. तज्ञांच्या मते कमी दुधाचा चहा पिणे आरोग्यास लाभदायी असते.
* मसाला चहा
मसाला चहा (Masala tea) हा आरोग्यदायी असतो. लवंग, वेलची, आले, दालचीनी, तुळस घालून केलेला चहा आरोग्यास चांगलाअसतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.