पावसाळ्याच्या दिवसांमध्ये (Rainy days) हिल स्टेशनला (Hill Station) भेट द्यायला सर्वांनाच आवडते. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या जोडीदारासोबत (partner) फिरायला जायचे असेल तर वेळ न घालवता कर्नाटकमधील (Karnataka) चिकमगलूरला (Chikmagalur) जायची तयारी करा. ही खूप सुंदर जागा (Beautiful place) आहे. चिकमगलूर म्हणजे छोट्या पहाडांचे नगर,चला तर जाणून घेऊया याठिकाणाबद्दल अधिक माहिती.
कर्नाटकमधील हे एक खूप सुंदर हिल स्टेशन आहे. शांत वातावरण, वाहणारी नदी , असे निसर्गरम्य वातावरण येथे आहे. हे ठिकाण चित्रपटांमध्ये दाखवलेल्या हिल स्टेशनसारखे आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमॅंटिक फोटोज् काढू शकता. या ठिकाणाला "कॉफी लँड" (Coffee Land) म्हणतात, कारण येथे कॉफी (Coffee) आणि चहाची (Tea) मोठ्या प्रमाणात लागवड होते.
जेव्हा तुम्ही चिकमगलूरला जाणार तेव्हा बाबा बुदाम गिरी पहाडला (Baba Budan giri) नक्की भेट द्या. येथील एक दरगा लोकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. तसेच कुदरेमुखाच्या (Kudurekuha) सुंदर पर्वतरांगा आहेत. गवत आणि घनदाट जंगलांनी वेढलेले हे ठिकाण दुरून पाहिल्यावर घोड्याच्या चेहऱ्यासारखे दिसते, म्हणूनच याला कुदरेमुख पर्वत रांगा असे नाव देण्यात आले आहे.
जेव्हा तुम्ही चिकमगलूरला जाणार तेव्हा बाबा बुदाम गिरी पहाडला नक्की भेट द्या. येथील एक दरगा लोकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. तसेच कुदरेमुखाच्या सुंदर पर्वतरांगा आहेत. गवत आणि घनदाट जंगलांनी वेढलेले हे ठिकाण दुरून पाहिल्यावर घोड्याच्या चेहऱ्यासारखे दिसते, म्हणूनच याला कुदरेमुख पर्वत रांगा असे नाव देण्यात आले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या ठिकाणाला नक्की भेट द्या. येथील हेब्बे धबधबा लोकांना आकर्षित करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.