Vitamin C Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vitamin C Benefits : 'व्हिटामीन सी'चे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा सविस्तर

Vitamin C Benefits : व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

दैनिक गोमन्तक

Vitamin C Benefits : आधुनिक काळात निरोगी राहणे आव्हानापेक्षा कमी नाही. यासाठी संतुलित आहार घ्या आणि रोज व्यायाम करा. समतोल आहारात सर्व आवश्यक पोषक घटक आढळतात. यापैकी कोणत्याही एका पोषक तत्वाच्या कमतरतेचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

विशेषतः, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याशिवाय त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. संत्री, आवळा, पेरू, शिमला मिरची, चिंच इत्यादी गोष्टींचा आहारात समावेश करू शकता. जाणून घेऊया त्याचे फायदे : (Health Care Tips Vitamin C Benefits for skin)

कोलेजन वाढते :

कोलेजन हे शरीरात आढळणारे एक प्रकारचे प्रथिने आहे. हे हाडे, त्वचा आणि स्नायूंसाठी एक प्रमुख घटक आहे. त्वचेला ताकद देणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. यासाठी कोलेजनचे प्रमाण वाढणे अत्यंत आवश्यक आहे. शरीरात कोलेजनच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. या समस्येवर मात करण्यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टींचा नक्कीच समावेश करा.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आहारात व्हिटॅमिन-सी समृद्ध अन्न समाविष्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. बदलत्या ऋतूत निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन-सी युक्त अन्न जरूर खा.

त्वचा नितळ बनते :

व्हिटॅमिन सी युक्त अन्न खाल्ल्याने त्वचा चमकदार होते. तसेच त्वचा गुळगुळीत करते. चेहऱ्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरते.

हायपरपिग्मेंटेशनमध्ये आराम मिळतो :

हायपरपिग्मेंटेशनचा त्रास असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काळे डाग पडू लागतात. यासोबतच त्वचेचा रंग काही ठिकाणी काळा होऊ लागतो. जर तुम्हीही हायपरपिग्मेंटेशनच्या समस्येने त्रस्त असाल, तर आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचा अवश्य समावेश करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT