Healthy Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: 1 महिनाभर ब्रेड किंवा चपाती खाणे बंद केले तर शरीरात होतात 'हे' मोठे बदल

Healthy Tips: एक महिनाभर ब्रेड किंवा चपाती खाणे बंद केले तर शरीरात होतात हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Healthy Tips: चपाती आणि ब्रेडमध्ये ग्लूटेन हा एक घटक असतो. अनेक लोकांना हा घटक आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. ज्या लोकांना सेलियाक आजार आहे किंवा संसर्ग आहे अशा लोकांनी चपाती किंवा ब्रेड खाणे टाळावे.

ग्लूटेनमुळे पचनासंबंधित समस्या वाढू शकतात. जर तुम्ही महिनाभरासाटी हे खाणे बंद केले तर शरीरात कोणते बदल होतात हे जाणून घेऊया.

पोटासंबंधित समस्या

तज्ञांच्या मते ब्रेड आणि चपाती खाणे बंद केल्यास असरीरात अनेक बदल दिसून येतात. जर तुम्हाला पोटा संबंधित समस्या असेल तर त्या कमी होतात.

पोटदुखी, थकवा, डोकेदुखी कमी होते. तसेच त्वचे संबंधित समस्या देखील कमी होतात.

वजन नियंत्रणात

काही लोकांना त्यांच्या आहारातून ब्रेड आणि चपाती खाणे बंद केल्यास वजन कमी होऊ शकते. शरीरातील कॅलरी कमी झाल्यामुळे तसेच पचनक्रिया सुरळित असल्यामुळे वजन कमी होऊ शकते.

एनर्जी

सेलिआक रोग किंवा ग्लूटेन संवेदनशीलता असलेल्या लोकांना त्यांच्या आहारातून ब्रेड किंवा चपाती खाणे बंद केल्यास एनर्जी वाढू शकते आणि चांगला मूड येऊ शकतो.

कारण यामुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत मिळते.

पोषक घटक

कधीकधी चपाती खाणे बंद केल्यास शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. कारण अनेक ग्लूटेन-युक्त धान्य आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात.

यामुळे पर्यायी पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींगच्या निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

SCROLL FOR NEXT