Brain Tumor  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Brain Tumor Symptoms: ब्रेन ट्यूमरच्या या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

healthy Tips: ब्रेन ट्यूमर पेशी असामान्यपणे वाढतात.

दैनिक गोमन्तक

ब्रेन ट्यूमर हा एक असा आजार आहे, त्यावर वेळीच उपचार न केल्यास तो जीव गमावून बसु शकतो. ब्रेन ट्यूमरची (Brain Tumor) तीव्रता समजून घेण्यासाठी, सर्वप्रथम ब्रेन ट्यूमरची लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे. ट्यूमरचे वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल, चक्कर आल्यासारखे वाटत असेल, तर या लक्षणांकडे दु्र्लक्ष करू नका. कारण ब्रेन ट्यूमरमध्येही अशीच लक्षणे असतात. ब्रेन ट्युमरवर योग्य वेळी उपचार न केल्यास ट्युमर फुटू शकतो. जाणून घेउया ब्रेन ट्यूमरची लक्षणे कोणती आहेत. (Brain Tumor Symptoms)

* ब्रेन ट्यूमरची लक्षणे

कॅन्सर रिसर्च यूकेनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कवटीची जागा कमी होऊ लागते, तेव्हा ट्यूमरची लक्षणे दिसू लागतात. ट्यूमरच्या आकारात वाढ झाल्यामुळे हे घडू शकते. ट्यूमरची लक्षणे कशी असतील हे ट्यूमरच्या स्थानावर देखील अवलंबून असते. ट्यूमर वाढण्यास किती वेळ लागेल ते व्यक्तीपरत्वे बदलू शकते. ते वाढण्यास काही महिने ते काही वर्षे लागू शकतात.

* ब्रेन ट्यूमरची चिन्हे

वारंवार तीव्र डोकेदुखी

अस्पष्ट उलट्या होणे किंवा अस्वस्थ वाटणे

धूसर दृष्टी

दुहेरी दृष्टी

नंतर हात आणि पायांची हालचाल

समतोल राखण्यात अडचण

बोलण्यात अडचण

थकवा जाणवणे

दैनंदिन व्यवहारात गोंधळ

नैराश्य

* ब्रेन ट्यूमर उपचार

ब्रेन ट्युमरचे लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार शक्य आहेत. ब्रेन ट्यूमरचा उपचार विविध कारणांवर आणि त्याच्या लक्षणांवर अवलंबून असतो. खालील घटक ब्रेन ट्यूमरच्या उपचारांचा कोर्स ठरवतात -

* रुग्णाचे वय, एकूण आरोग्य आणि वैद्यकीय इतिहास

* ट्यूमरचा प्रकार काय आहे, तो कुठे आहे आणि तो किती मोठा आहे?

* ट्यूमरच्या पुनरावृत्तीचे स्वरूप काय आहे?

* विशिष्ट प्रकारची औषधे आणि वैद्यकीय प्रक्रियांना रुग्णाची सहनशीलता आणि प्रतिसाद

* घरगुती उपाय

ब्रेन ट्यूमरवरही अनेक घरगुती उपायांनी उपचार करता येतात. ब्रेन ट्यूमरच्या रुग्णाने मशरूमचे सेवन करावे. हे त्याच्यासाठी फायदेशीर आहे.

* योग करणे

ब्रेन ट्यूमरच्या रुग्णासाठी योगासने खूप फायदेशीर आहेत, म्हणूनच रुग्णाने योगासने करत राहावे.

* बायोप्सी करून घेणे

बायोप्सीद्वारे शरीरात किती कॅन्सर आहे हे कळते, त्यामुळे बायोप्सी करणेही फायदेशीर ठरते.

* मेंदूची शस्त्रक्रिया

जेव्हा ट्यूमर अधिक वाढतो आणि त्यावर उपचार करणे शक्य नसते, तेव्हा डॉक्टर मेंदूच्या शस्त्रक्रियेचा सल्ला देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT