Jaggery Water Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Jaggery Water Benefits: गुळाचे पाणी प्यायल्याने होतात 'हे' फायदे; वजन कमी होतेच पण...

गुळ औषधी गुणांनी समृद्ध असतो.

दैनिक गोमन्तक

Jaggery Water Benefits: गुळ औषधी गुणांनी समृद्ध असतो. याचे पाणी शरीराच्या आरोग्यासाठी रामबाण औषध मानले जाते.

वडिलधारी मंडळी आधीपासूनच गुळाचे पाणी वापरत आले आहेत, पण आज त्याचे प्रमाण कमी झाले आहे.

याचा दररोज वापर केल्यास शरीरातील अनेक आजार टाळता येतात. यामुळे शरीर पूर्णपणे फिट होते. गुळाच्या पाण्यात अनेक प्रकारचे फायदेशीर घटक असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच, पण वजनही झपाट्याने कमी होते.

जर तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासारखे तंदुरुस्त आणि सडपातळ शरीर मिळवायचे असेल तर गुळाचे पाणी तुम्हाला मदत करू शकते. जाणून घेऊया त्याचे फायदे...

गुळाच्या पाण्याचे फायदे

वजन कमी होते

शरीरातील चरबी जाळायची असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर गुळाचे पाणी जरूर प्यावे. गुळाचे पाणी प्यायल्याने शरीराचे वजन सहज कमी करता येते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी गुळाचे पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. गुळाच्या पाण्यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्यामुळे शरीर अनेक आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकते.

रक्ताची कमतरता दूर होते

एखाद्याला अॅनिमिया किंवा कमी हिमोग्लोबिनचा त्रास असेल तरीही गुळाचे पाणी प्यायल्याने आराम मिळतो. गुळाचे पाणी शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासही मदत करते. त्यामुळे गुळाचे पाणी रोज प्यायल्यास अॅनिमियाही सहज बरा होऊ शकतो. गुळाचे पाणी पिणे रक्ताची समस्या असो किंवा हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी, अशा स्थितीत गुळाचे पाणी फायदेशीर मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT