Dates Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Benefits of Dates: शक्तीवर्धक आणि औषधी गुणधर्मांचा 'हा' पदार्थ नेहमी तुमच्या आहारात ठेवा...

Ganeshprasad Gogate

Health Benefits of Dates: काहींना वजन कमी करण्याची गरज असते तर काहींना वजन वाढविण्याची आवश्यक्यता असते. वजन वाढण्यासाठी खजुराचा चांगला उपयोग होतो. खजूर हा शक्तीदायक मेवा आहे. खजूर म्हणजे एक प्रकारची खारीकच. चांगली पिकलेली खारीक शेवटी काळी गोड व नरम खजूर बनते.

खजुराच्या झाडाची उत्पन्न-भूमी म्हणजे वालुकामय प्रदेश अरबस्थान, मध्य आशिया त्याचप्रमाणे आपला सिंध प्रांत इत्यादी ठिकाणी खजुराची झाडे आढळतात. खजुराच्या झाडांपासून वर्षभर खजूर मिळत असतो.

खजुराचे झाड उंच असते. नारळाच्या झाडाच्या खालोखाल त्याची उंची असते. खजुराच्या झाडाच्या पानांचाही व्यावहारिक अनेक तऱ्हेचा उपयोग होतो.

त्यापासून पंखे, चटया, टोपल्या रस्सी वगैरे वस्तू तयार करतात. खजुराच्या झाडाच्या खोडाला अगदी वर खाचा पाडून तेथून गळणारा रस एकत्र केला जातो. त्यालाच नीरा म्हणतात.

काही लोकांचा खजुराविषयी भलताच गैरसमज झालेला असतो. लोकांचा असा समज आहे की, खजूर फार गरम असल्याने रक्तपित्ताची बाधा होण्याची शक्यता अधिक ! त्यामुळे काही लोक खजूर खाण्याचे टाळतात. पण हे चुकीचे आहे.

हा गैरसमज असून वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे. वास्तविक खजूर त्या मानाने थंड आहे. खजुरापासून शक्तीवर्धक कार्य केले जाते.

खजूर स्निग्ध, हृदयाला हितकारी, शरीरात रक्त व मांस याची वृद्धी करणारा आहे. खजूर ज्याप्रमाणे शरीराला व शक्तीला पोषक ठरतो, त्याचप्रमाणे काही काही विकारांवरही तो औषधाप्रमाणे उपयोगी ठरतो.

अधिक भूक लागणे, खोकला येणे, दमा, मूर्च्छा यांसारख्या विकारांवर व दारूमुळे झालेल्या रोगांवर खजूर - लाभदायक ठरतो. खजुराच्या झाडापासून काढण्यात येणारी नीराही फारच गुणकारी पेय आहे. नीरा शक्तीवर्धक आहे.

खजूर दिसण्यात चांगला व चवीला गोड असतो. तो सुक्या खोकल्यावर आणि दम्यावर गुणकारी ठरतो. खोकल्यामुळे घसा जेव्हा सुकून येतो तेव्हा द्राक्षे, तूप, साखर व मध वगैरेबरोबर खजुराचाही उपयोग करावा म्हणजे खोकल्याला आळा बसतो.

क्षय झाला असता कफाबरोबर जेव्हा रक्त पडू लागते तेव्हा खजूर खावा त्यामुळे रक्त पडण्याला आळा घातला जातो.

(वरील सर्व माहिती ही विविध स्रोतांमधून घेण्यात आली असून यामधून दैनिक गोमंतक कोणताही दावा करत नाही)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT