brisk walking benefits, Health Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Care Tips: ब्रिस्क वॉक केल्याने मानसिक स्वास्थ्य राहते चांगले

ब्रिस्क वॉक केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

दैनिक गोमन्तक

निरोगी राहण्यासाठी योगा करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला जिममध्ये जाऊन वर्कआऊट करू शकत नसाल तर तुम्ही चालत जाऊन स्वत:ला निरोगी ठेवू शकता. चालणे देखील आरोगीसाठी फायदेशीर असते. आरोग्यतज्ञांच्या मते दिवसातून 30 मिनिट व्यायाम करायला पाहिजे. चालण्याची गती बदल करणे म्हणजे ब्रिस्क वॉक होय. ब्रिस्क वॉक केल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते. तसेच ब्रिस्क वॉकचे इतरही अनेक आरोग्य फायदे आहेत. (Brisk walking benefits)

ब्रिस्क वॉकचे आरोग्य फायदे

* मानसिक आरोग्य सुधारते

नियमितपणे ब्रिस्क वॉक केल्याने मानसिक आरोग्य (Mental Health) चांगले राहते. संशोधनात असेही दिसून आले की,हा व्यायाम केल्यानं आपला आत्मविश्वास वाढतो, तसेच झोपेची समस्या दूर होते.

* रक्तातील साखरेची पातळी

मधुमेह असणाऱ्या लोकांनी हा व्यायाम केल्यास रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. कारण हा व्यायाम रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही.

* वजन नियंत्रणा राहते -

ब्रिस्क वॉक नियमितपणे केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होतात. तसेच असे चालल्याने जास्त कॅलरी बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते. फिरल्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं आणि दिवस चांगला जातो.

* हृदय व रक्तवाहिन्यां सुरळीत कार्य करते

ब्रिस्क वॉक नियमितपणे केल्याने हृदय (Heart) व रक्तवाहिन्या सुरळीत कार्य करते. तसेच नियमित चालल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. व्यायामामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझे घर' योजना अडचणीत, उच्च न्यायालयाची गोवा सरकारला 'नोटीस'; उत्तरासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदत

भारतात क्रिप्टो चलन कोठून आणि कसे खरेदी करावे? संपूर्ण प्रक्रिया, संभाव्य धोके तसेच काय काळजी घ्यावी जाणून घ्या

CBI अधिकारी बनून फसवणूक! बंगळुरुतील सॉफ्टवेअर इंजिनिअरला 32 कोटींचा गंडा, मानसिक त्रासाने बिघडली महिलेची तब्येत

IND vs SA: ''टीममध्ये काहीतरी गडबड...''! भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवावर चेतेश्वर पुजारा संतापला, फलंदाजांना फटकारले VIDEO

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

SCROLL FOR NEXT