Benefits of Eating Broccoli Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefits of Broccoli : ब्रोकोली खाण्याने मधुमेह होतो दूर; जाणून घ्या संपूर्ण फायदे

शरीरातील कॅल्शियम, लोह आणि प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी ब्रोकोली खा.

दैनिक गोमन्तक

आजकाल लोक पांढऱ्या कोबीऐवजी हिरवी कोबी खाण्यास प्राधान्य देतात. हिरव्या कोबीला ब्रोकोली म्हणतात. ही खूप फायदेशीर भाजी आहे. पांढऱ्या कोबीपेक्षा ब्रोकोलीचे गुणधर्म अनेक पटीने जास्त असतात. यामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. शरीरातील कॅल्शियम, लोह आणि प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी ब्रोकोली खा.

(Benefits of Eating Broccoli)

ब्रोकोली ही प्रथिने समृद्ध भाजी आहे. यामध्ये झिंक, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए, सी सारखे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ब्रोकोलीमध्ये पॉलीफेनॉल, क्वेर्सेटिन आणि ग्लुकोसाइड यांसारखे पोषक घटक आढळतात, जे मधुमेह देखील नियंत्रित करतात. ब्रोकोलीचा वापर तुम्ही भाजी, सूप किंवा सॅलड म्हणून करू शकता. जाणून घ्या ब्रोकोली खाण्याचे फायदे.

Health Benefits of Eating Broccoli

ब्रोकोली खाण्याचे फायदे :

  • साखरेच्या रुग्णाने हिरव्या भाज्या खाव्यात. ब्रोकोली खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे लठ्ठपणाही वाढत नाही आणि मधुमेहाच्या रुग्णाला फायदा होतो.

  • ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक चांगल्या प्रमाणात आढळतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

  • ब्रोकोली फायबर, पोटॅशियम आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली सॅलड किंवा सूप नक्कीच प्या. डायटिंग करताना ब्रोकोली खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो.

  • ब्रोकोली खाल्ल्याने यकृत निरोगी होते. यामध्ये कॅन्सरविरोधी आणि हेपॅटोप्रोटेक्टिव्ह घटक असतात जे यकृत निरोगी बनवतात. हिवाळ्यात त्याला आहाराचा भाग बनवा.

  • हाडे मजबूत करण्यासाठी ब्रोकोली खावी. यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते. ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT