Milk Biscuits Syndrome Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Milk Biscuits Syndrome: मुलांना दूध अन् बिस्किटे खायला दिल्यास होऊ शकतो 'हा' आजार, जाणून घ्या लक्षण

तुम्ही देखील लहान मुलांना दूध आणि बिस्किटे खायला देत असाल तर ही बातमी पहिले वाचा

Puja Bonkile

Milk Biscuits Syndrome: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दूध हे खूप महत्वाचे आहे. पण अशी अनेक मुले आहेत जी दूध पिण्यास नकार देतात. अशावेळी पालक मुलांच्या आवडीची बिस्किटे, कुकीज आणि इतर अनेक प्रकारची बिस्किटांचे आणुन देतात. तसेच त्यांचा हट्ट देखील पुरवतात.

लहान मुलांना हे कॉम्बिनेशन खुप आवडते. अशा प्रकारे मुलांना हे पदार्थ खाण्याची सवय लागते. मग मुलं मागणीनुसार दुधाची बिस्किटे खातात. त्यामुळे मुलांमध्ये मिल्क बिस्किट सिंड्रोम होतो आणि पालकांनाही त्याची माहिती नसते.

डॉक्टर सहसा दूध बिस्किट सिंड्रोमला दूध (Milk) आणि कुकी (Biscuit) रोग म्हणून संबोधतात. इतर खाद्यपदार्थ देखील यासाठी जबाबदार आहेत. चला जाणून घेऊया मिल्क बिस्किट सिंड्रोम काय आहे आणि त्याचे लक्षण काय आहे.

  • मिल्क बिस्किट सिंड्रोम म्हणजे काय?

हा सिंड्रोम दुग्धजन्य पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह आणि साखर असलेल्या दुग्धजन्य पदार्थांमुळे होतो. बिस्किटांमध्ये भरपूर साखर, मैदा असतो. दूध आणि बिस्किटे झोपण्यापूर्वी खाल्ल्यास या पदार्थांमध्ये असलेले अॅसिड पुन्हा पोटात जाते आणि काहीवेळा घशात पोहोचते. 

अशा परिस्थितीत मुलांना मोठ्यांप्रमाणे छातीत जळजळ होत नाही. त्यामुळेच त्यांना अनेकदा नाक वाहणे, छातीत कफ येणे, खोकला किंवा घसा खवखवणे अशा समस्या होतात. हे सर्व दूध बिस्किट सिंड्रोममुळे होते. 

जर तुम्ही तुमच्या मुलांना रोज रात्री दूध प्यायला देत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाला खोकला, कफ किंवा घसा खवखवणे, बद्धकोष्ठतेची समस्या आहे, तर तुम्ही बालरोगतज्ञांना भेटणे आवश्यक आहे.

अन्यथा तुमच्या मुलाला अॅसिडिटी सारख्या समस्या होऊ शकतात. जुलाब, बद्धकोष्ठता, वजन वाढणे. तसेच शीतपेये, सोडा, चवीनुसार दही, आईस्क्रीम चे सेवन केल्यास यासारख्या समस्या होउ शकतात.

मिल्क बिस्किट सिंड्रोमची लक्षण कोणती?

  • रात्री दूध आणि बिस्किटे खाण्याचा आग्रह करणे.

  • जेवल्यावरही दूध-बिस्किटे खाण्याचा आग्रह करणे.

  • बिस्किटाशिवाय दुधाचे सेवन न करणे.

  • जेवणाऐवजी फक्त दूध आणि बिस्किटे खाण्याचा हट्ट

  • दिवसातून अनेक वेळा दूध आणि बिस्किटे खाण्याचा आग्रह करणे.

दूध बिस्किट सिंड्रोममुळे होणारी समस्या

  • दात किडणे

  • बद्धकोष्ठता समस्या

  • लठ्ठपणा

  • मधुमेह

  • साखर पातळी वाढवा

  • कमकुवत प्रतिकारशक्ती

  • या समस्यावर उपाय कोणते

तुम्हालाही तुमच्या मुलांमध्ये अशी काही लक्षणे दिसली तर त्यांना लगेच डॉक्टरांना न्यावे. यावर पोषणतज्ञ किंवा आहारतज्ञांच्या मदतीने उपचार करता येतात. तुम्ही मुलाला डॉक्टर किंवा पोषणतज्ञांकडे घेऊन जाउ शकता. ते योग्य ते डाइट प्लॅन देतात. त्यानुसार मुलाचा आहार द्यायला सुरुवात करावी. काही दिवस मुलांना दूध देणे बंद करा, त्यांना सकस आहार द्यावा.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Midterm Elections Result: महागाई, भ्रष्टाचार अन् इराण युद्ध पडले महागात! ट्रम्पला अमेरिकन जनतेचा मोठा दणका; डेमोक्रॅट्सचा दणदणीत विजय

Modi Cabinet Decision: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची खूशखबर! अग्निवीरांना मिळणार 2 वर्षांचा सेवा विस्तार; लाखो जवानांना मोठा दिलासा

VIDEO: "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं!", अर्शदीपच्या खास 'डान्स स्टेप'चा व्हिडिओ तुफान व्हायरल; चाहत्यांचं जिंकलं मन

कर्तव्यात कसूर अन् युद्धनौका धोक्यात आणल्याचा ठपका! INS ब्रह्मपुत्र दुर्घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल; भारतीय नौदलाची मोठी कारवाई

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

SCROLL FOR NEXT