Teacher's Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Teacher's Day 2023: 'या' 4 पद्धतीने शिक्षक दिन बनवा स्पेशल

शिक्षकांचा दिवस स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Teacher's Day 2023: दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो.

या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात. देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये हा दिवस अतिशय खास पद्धतीने साजरा केला जातो. या खास दिवशी विद्यार्थी भाषण देतात. तसेच आपल्या शिक्षकांना भेटवस्तू देतात. शिक्षकांसाठी हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही पुढिल टिप्स फॉलो करू शकता.

  • कार्यक्रम आयोजित करू शकता

शिक्षक दिनानिमित्त तुम्ही वर्गात छोटासा कार्यक्रम आयोजित करू शकता. शिक्षक दिन साजरा करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. यामध्ये विविध प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. तुमच्या शाळेतील आठवणी शेअर करू शकता. हा विविधतेत एकता दाखवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या बिझी शेड्युलमधून थोडा वेळ काढून तुम्ही कार्यक्रम प्लॅन करू शकता.

  • मेमरी बुक

शिक्षकांसाठी मेमरी बुक बनवून हा हिवस स्पेशल बनवू शकता. तुमच्या शिक्षकांच्या सुंदर आठवणींचे संकलन करून तुम्ही एक मेमरी बुक तयार करू शकता. ही बुक भेटवस्तु म्हणून शिक्षकांना देऊ शकता.

  • थँक्यु व्हिडिओ

जर तुम्हाला काही वेगळे करायचे असेल तर तुम्ही थँक्स व्हिडिओ देखील बनवू शकता. हा व्हिडिओ पाहून तुमच्या शिक्षकांना खुप आनंद मिळेल. आपल्या सर्वांचे शिक्षक वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि देशांमध्ये राहतात. तुम्ही या शिक्षक दिनी एक खास व्हिडिओ बनवू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या शिक्षकांसोबतच्या आठवणी शेअर करून त्यांचे शिक्षणाबद्दल आभार मानू शकता.

  • थँक्यु नोट

तुम्ही शिक्षकामुळे तुमच्या आयुष्यात यशस्वी झाला आहात.हे एका शिक्षकासाठी खुप मोठी गोष्ट असून शकते. यंदा शिक्षकांचा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही त्यांना थँक्यु नोट लिहू शकता. तुमची ही नोट पाहून त्यांचा दिवस खरच खास बनेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT