HBD Twinkle Khanna Dainik Gomantak
लाइफस्टाइल

HBD Twinkle Khanna: ट्विंकल खन्नाचा आनंदी अन् निरोगी राहण्याचा सिक्रेट फंडा, वाचा एका क्लिकवर

तुम्हाला देखील राहायचे आहे फिट आणि निरोगी तर फॉलो करा ट्विंकल खन्नाचा सिंपल फिटनेस फंडा.

दैनिक गोमन्तक

आज ट्विंकल खन्ना आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयातही ती खुप फिट आहे. याचे कारण म्हणजे तीची लाइफस्टाइल आहे. तसेच अनेक बॉलीवूड अभिनेत्री वाढत्या वयानुसार पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि फिट दिसतात.

ट्विंकल रुपेरी पडद्यापासून नक्कीच दूर आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली आहे. अलीकडेच तिने त्याच्या चाहत्यांना लाइफस्टाइलच्या काही टिप्स दिल्या आहेत.

वास्तविक, ट्विंकल खन्नाने अलीकडेच तिच्या ट्वीक इंडिया चॅनलद्वारे तरुण, आनंदी आणि फिट दिसण्यासाठी काही रहस्ये शेअर केली आहेत.सर्वांना माहीत आहे की, ट्विंकल खन्ना मिसेस फनी बोन्स या नावाने प्रसिद्ध आहे. ती नेहमी हसत असते आणि मस्करी करत असते. तिच्या मजेदार स्वभावाची झलक तुम्हाला तिच्या फोटो आणि व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.चला तर मग जाणून घेउया ट्विंकलचा फिटनेस फंडा कोणता आहे.

  • ट्विंकलचा फिटनेस फंडा

वयाच्या 48 व्या वर्षीही तंदुरुस्त दिसणाऱ्या ट्विंकल खन्ना हिने सांगितले आहे की, प्रत्येकाने रोज काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवे.

ट्विंकलने खाण्यापिण्याच्या पद्धतींबद्दल सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीच्या जेवणाचे प्रमाण कमी असावे. तिच्या म्हणण्यानुसार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमानही ही सवय पाळतात आणि ट्विंकललाही त्याच्यापासून प्रेरणा मिळाली आहे.

ट्विंकलने तिच्या लाइफस्टाइल (Lifestyle) सिक्रेट उघड करत चाहत्यांना सल्ला दिला की त्यांनी स्वतःला जास्त गांभीर्याने घेऊ नये आणि आनंदी राहावे

वाचनाची सवय तुमच्या रोजच्या दिनक्रमात ठेवा.

दरम्यान, ट्विंकल खन्नाने इंस्टाग्रामवर एक थ्रोबॅक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यामध्ये ट्विंकल खुप गोंडस दिसत आहे. वडील राजेश खन्ना आपल्या मुलीकडे प्रेमाने पाहत आहेत. ट्विंकलच्या बालपणीच्या सर्व आठवणी या फोटोसोबत (Photo) जोडल्या आहेत.

या फोटोवर मलायका अरोरा, बॉबी देओल, अनिता श्रॉफ सारखे सेलिब्रिटी प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तर काही चाहते ट्विंकल खन्नाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत तर काही हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या सुपरस्टारची आठवण करत आहेत.

अक्षय कुमारने ट्विंकलला मजेदीर व्हिडिओ शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांसारख्या प्रसिद्ध स्टार्सची मुलगी ट्विंकलनेही अभिनयात हात आजमावला पण आता ती लेखन आणि कुटुंबात व्यग्र आहे. ती इंटिरिअर डिझायनरही आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT