Hair Fall Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair Fall: डोक्यात घाम येणे असु शकते केस गळतीचे कारण

तुम्हाला माहितीय का की डोक्यात घाम आल्याने केस गळू शकतात.

Puja Bonkile

Hair Fall: उन्हाळ्याच्या दिवसात केस वेगाने गळतात. उन्हामुळे केसांमध्ये खुप घाम येतो. यामुळे देखील केस लवकर खराब होतात. तुम्ही जर जिममध्ये बराच वेळा व्यायम करून फिट राहू शकता, पण केस गळण्याची समस्या वाढू शकते. केसांमध्ये कोंडा आणि तेलकटपणा वाढल्यास केस गळू लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का डोक्यात घाम आल्याने केस वेगाने गळू लागतात.

केसांमध्ये घाम आल्यास कोणते दुष्परिणाम दिसतात?

  • केस गळणे

घाम आणि प्रदूषणामुळे डोक्यात एक थर साचतो. या थरामुळे केसांमध्ये कोंडा तयार होतो. केसांमधील कोंडा कमी न झाल्यास केस गळतात. कोंडा कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा लिंबू आणि दही मिक्स करून लावावे.

  • खाज सुटणे

डोक्यात जास्त घाम आल्यास काही वेळाने डोक्यात खाज सुटते. संशोधनात असे समोर आले आहे की, घामामुळे डोक्याचे छिद्र बंद होतात आणि एक थर जमा होऊ लागतो.डोक जास्त खाजवल्याने केसांची मुळ कमजोर होतात आणि गळू लागतात. घामामुळे होणारी खाज कमी करण्यासाठी केसांमध्ये दही आणि लिंबाचे मिश्रण लावावे. नंतर शॅम्पु लावून स्वच्छ पाण्याने केस धुवावे.

  • केसांमध्ये दुर्गंधी

डोक्याला खाज येण्यासोबतच घामामुळे केसांमध्ये दुर्गंधी येण्याची समस्या निर्माण होते. केस सतत मोकळे ठेवणे शक्य नसते आणि घामामुळे केसांना दुर्गंधी येऊ लागते. उन्हाळ्यात केसांना दुर्गंधीपासून दूर ठेवायचे असेल तर आठवड्यातून किमान तीन वेळा शॅम्पू करावा.

  • केसांमध्ये चिकटपणा

घामामुळे केस चिकट होतात. यामुळे केस खराब होतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर शरीरात हार्मोनल बदल होत असतील तर त्यामुळे जास्त घाम येण्याची समस्या उद्भवू शकते. याशिवाय खूप मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. तसेच केस आठवड्यातुन दोन शॅम्पुने स्वच्छ धुवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT