Aloe vera gel Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Aloe Vera Gel: मजबुत अन् घनदाट केसांसाठी असा करा कोरफडचे जेलचा वापर

Aloe Vera Gel on Hair Care: कोरफड जेल लावताना अनेक लोक छोट्या चुका करतात.ज्यामुळे केसांना जास्त नुकसान होतात.

दैनिक गोमन्तक

Healthy Hair Care Tips: आपले केस नेहमीच मजबूत, काळे आणि चमकदार असावेत अशी आपली सर्वांची इच्छा असते. परंतु प्रदूषण आणि तणावामुळे केस गळू लागतात.

कोरफड जेल नियमितपणे केसांना लावल्याने केस मजबूत आणि निरोगी राहतात.

याशिवाय हे जेल केसांना चमकदार आणि मुलायम बनवते. परंतु कोरफडचे जेल केसांमध्ये योग्य प्रकारे वापरणे देखील महत्त्वाचे आहे.

जेणेकरून ते केस मजबूत आणि निरोगी राहतील. केसांमध्ये कोरफड जेल कसे वापरायचे ते जाणून घेऊया.

कोरफड जेलचा कसा वापर करावा 

  • कोरफड जेलचे प्रमाण

    तुमचे केस जितके जास्त असतील तितके जास्त कोरफड जेल लावावे.

  • धुतलेले केस

    जर तुम्ही कोरफड जेलपासून मास्क बनवत असाल तर तो धुतलेल्या आणि अर्ध वाळलेल्या केसांवर लावावा.

  • जेल लावण्याची पद्धत

    कोरफड जेल केसांवर पूर्णपणे लावावे. विशेषतः केसांच्या मुळांमध्ये लावावी.

  • किती वेळ लावायचे

    कोरफड जेल केसांमध्ये किमान 30 मिनिटे राहू द्यावे. तुम्ही रात्रभर देखील लावून ठेऊ शकता.

  • केस कधी धुवावेत

    कोरफड जेल लावल्यानंतर पूर्णपणे शॅम्पू करावे.नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवावे.

  • हेअर सीरम

    कोरफड जेल हे निसर्गाने चांगले केस सीरम आहे. कोणत्याही केसांच्या सीरमप्रमाणे थेट आपल्या केसांवर देखील लावू शकता. 

  • कोरफड जेलचे फायदे

कोरफड जेलमध्ये अनेक पोषक घटक आणि जीवनसत्वे असतात. त्यात व्हिटॅमिन ए आढळते. जे त्वचेच्या पेशींच्या वाढीसाठी फायदेशीर असते.

व्हिटॅमिन सी, एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट, त्वचेचे संरक्षण करते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. 

व्हिटॅमिन ई त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करते, तर व्हिटॅमिन बी 12 रक्त निर्मिती आणि मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

या जीवनसत्त्वांव्यतिरिक्त, कोरफड जेलमध्ये खनिजे, एन्झाईम्स, एमिनो अॅसिड आणि सॅलिसिलिक अॅसिड यांसारखे इतर अनेक महत्त्वाचे घटक देखील असतात. जे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

5 बेडरूम, प्रायव्हेट पूल आणि सी व्ह्यू... अजय-काजोलचा गोव्यातला आलिशान व्हिला पाहिलात का? एका रात्रीसाठी मोजावे लागतील 'तब्बल' एवढे

जिवंत मासा गिळला; गोव्यात सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू Watch Video

ST Reservation Bill Passed: गोव्यातील एसटी समाजासाठी आनंदाची बातमी; राजकीय आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर

ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT