Google Map Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Google Map: गूगल मॅप्स वाढवेल तुमच्या कारचे मायलेज, करा फक्त 'ही' सेटिंग

गूगल मॅपचा वापर रस्ता शोधण्यासाठी केला जातो. पण अजुन एका खास कामासाठी याचा वापर केला जातो. हे काम कोणते आहे ते जाणून घेऊया.

Puja Bonkile

Google Map: जगभरात गूगल मॅपचा वापर रस्ता शोधण्यासाठी केला जातो. गूगल मॅपचा वापर इतका केला जात आहे की आता लोकांनी एकमेकांना अॅड्रेस विचारणे बंद केले आहे. आता गूगल मॅप लोकांचा त्यांच्या प्रवासातील साथीदार बनला आहे. गूगल मॅपमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या त्याला खास बनवतात. उदाहरणार्थ, जर तुमच्या कारचा स्पीडोमीटर तुटला असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण आता हा स्पीड गूगल मॅपमध्येही दिसतो.

गूगल मॅप आता एवढा प्रगत झाला आहे की आता टोल रस्त्यांची माहिती आधीच देतो आणि आता गूगल मॅपमुळे तुमच्या गाडीचे ऑइल देखील वाचणार आहे. तसे, गूगल मॅप्सने गेल्या वर्षीच 'इंधन-बचत' फीचर दिले होते पण ते फक्त अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये लाइव्ह होते. आता हे फीचर भारतीय यूजर्ससाठीही लाईव्ह करण्यात आले आहे. आता मॅप तुम्हाला असा रस्ता दाखवेल ज्यामुळे इंधनाची बचत होईल.

  • गूगल मॅपमध्ये इंधन फिचरचा कसा वापर करावा

गूगल मॅप अॅप ओपन करावा.

नंतर प्रोफाइल फोटोवर क्लिक करावे.

नंतर Settings वर जावे.

आता Route Options वर क्लिक करावे.

यानंतर Prefer Fuel-efficient routes चा वापर करावा.

नंतर इंजिन टाइप सिलेक्ट करावे.

नंतर तुम्हाला जिथे जायचे आहे ते ठिकाण शोधा आणि दिशेवर टॅप करावे.

नंतर खाली दिसत असलेल्या बारमधील Change engine type वर क्लिक करा.

नंतर तुमच्या गाडीचा इंजिन प्रकार (पेट्रोल, डिझेल, सीएनजी) निवडा.

यामुळे गूगल मॅप तुम्हाला गाडीच्या इंजिन प्रकारानुसार रस्ता दाखवणार. यामुळे तुमच्या इंधनाची बचत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT