Gold and Silver: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gold and Silver: सोन्या-चांदीचे दागिने चुकूनही एकत्र ठेवू नका, कारण...

सोन्या-चांदीचे दागिने महाग असल्याने खास काळजी घेणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Gold and Silver Ornaments side effects: सोन्या-चांदीचे दागिने महाग असल्याने खास काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही जर सोन्या-चांदीचे दागिने एकत्र ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण हे दागिने एकत्र ठेवल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

चांदी स्वच्छ न केल्यास काही दिवसांनी त्याची चमक कमी होऊ शकते. विशेषतः ऑक्सिडेशनमुळे चमक कमी होऊ शकते. चांदी देखील एक रिअॅक्टव धातू आहे. म्हणजेच जेव्हा ते इतर कोणत्याही धातूच्या संपर्कात येते तेव्हा त्याचे घटक प्रभावित होतात.

दुसरीकडे, सोनं नॉन-रिअॅक्टिव्ह धातूच्या श्रेणीत येतात. याचा अर्थ असा की त्याच्या आजूबाजूला जी काही धातू ठेवली जाते, ती त्याच्याशी कोणत्याही प्रकारे प्रभावित होत नाही.

सोन्या-चांदिचे दागिने एकत्र ठेवल्यास काय होईल?

सोन्या-चांदीचे दागिने बराच वेळ एकत्र ठेवल्यास सोन्याची चमक कमी होऊ शकते. चांदीच्या दागिन्यांवर थोडासा सोन्याचा थर दिसू लागेल. दोन्ही धातूंमध्ये प्रतिक्रिया सुरू झाल्याचा आणि त्यांच्या गुणधर्मांना हानी पोहोचू लागल्याचे हे थेट संकेत आहे. तरीही तुम्ही लक्ष दिले नाही तर तुमच्या दागिन्यांचा मूळ लुक खराब होईल.

या समस्या येतील

यामुळे तुमच्या दागिन्यांचा लुक खराब होईल तर दुसरीकडे तुम्हाला ते मूळ स्वरुपात परत आणण्यासाठी सोनाराकडे जाऊन मोठी किंमत मोजावी लागेल. एवढेच नाही पुन्हा विकण्यात अडचणी येऊ शकतात.

काय उपाय करावे

सोन्या-चांदीचे दागिने वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षितपणे ठेवावे. यासाठी वेगवेगळे बॉक्स वापरावे.स चुकूनही हे दागिने एकत्र ठेऊ नये. दान्ही दागिने वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवल्याने कोणतेही नुकसान होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT