Goans Prawns Curry Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goans Prawns Curry Recipe: गोवेकरांच्या जेवणाचा अविभाज्य भाग... चटपटीत सुंगटाचे हूमण!

आपल्या गोव्याच्या लोकांची पाककृती ही बहुदा सीफूडवर आधारित आहे.

Kavya Powar

Goans Prawns Curry Recipe: आपल्या गोव्याच्या लोकांची पाककृती ही बहुदा सीफूडवर आधारित आहे. इथल्या पाककृतीमध्ये लोकप्रिय अनेक प्रादेशिक खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तांदूळ, सीफूड, नारळ, भाज्या, मांस, ब्रेड आणि स्थानिक मसाले हे गोव्याच्या स्वयंपाक घरांमधील मुख्य घटक आहेत.

अस्सल गोवेकराचे जेवण हे माशाशिवाय अपूर्णच मानले जाते. रेसिपीच्या या सिरीजमध्ये आपण आज सुंगटाचे हूमण (कोळंबी करी - Goans Prawns Curry) कसे बनवायचे हे पाहणार आहोत.

साहित्य

  • 250 ग्राम कोळंबी

  • 1 कांदा उभा चिरलेला

  • 1/2 कप खोवलेला नारळ

  • 1 चमचे  धणे

  • 1 चमचे जिरे

  • 1 चमचे मिरी

  • 3-4 सुख्या लाल मिरच्या

  • 2 चमचे चिंचेचा कोळ

  • 1/2 कप नारळाचे दूध

  • मीठ चवी नुसार

  • तेल

  • पाणी आवश्यकते नुसार

कृती:

  • सर्वात आधी कोळंबी स्वच्छ साफ करून धावून घ्यावी.

  • कोळंबी साफ करतांना कोळंबीच्या मध्ये एक काळा धागा असतो तो काढून घ्यावा व कोळंबीला हळद, मीठ, लिंबाचा रस लावून 15 मिनिटे ठेवून द्यावे.

  • आता मिक्सरमध्ये नारळ, धणे, जिरे, मिरी, लाल मिरच्या आणि थोडं पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घ्यावी.

  • आता कढईत तेल गरम करून त्यात हे वाटण, हळद, मीठ घालून परतून घ्यावे.

  • थोडे तेल सुटत आले की त्यात चिंचेचा कोळ आणि पाणी उकळी येऊ द्यावी.

  • उकळी आली की त्यात स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी आणि नारळाचे दूध घालावे आणि 3-4 मिनिटे शिजू द्यावे.

  • इतक्या सोप्या स्टेप्ससह तयार आहे गोवन प्रॉन्स करी म्हणजेच सुंगटाचे हूमण. ही करी तुम्ही भातासोबत किंवा चपाती बरोबर सर्व्ह करू शकता.

(ही रेसिपी हळदोण्यात राहणाऱ्या मधुरा च्यारी यांनी आपल्यासोबत शेयर केली आहे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT