Goan Sungtache Lonche Recipe  
लाइफस्टाइल

Goan Sungtache Lonche: जेवताना तोंडी लावायला हवेच असे गोवन सुंगटाचे लोणचे....

'सुंगटाचे लोणचे' (कोळंबीचे) लोणचे हे गोव्यातील एक पारंपारिक लोणचे आहे.

Kavya Powar

Goan Sungtache Lonche Recipe : 'सुंगटाचे लोणचे' (कोळंबीचे) लोणचे हे गोव्यातील एक पारंपारिक लोणचे आहे. हे लहान किंवा मध्यम आकाराच्या कोळंबीचे बनवले जाते. ते आपल्या गोव्यातील मसाल्यांच्या उत्तम मिश्रणात शिजवलेले असते.

ही अप्रतिम रेसिपी इथल्या मांसाहार खाणाऱ्या प्रत्येक घरात बनवली जाते. सुंगटाचे लोणचे करण्यास जितके सोप्पे त्याहून अधिक ते खाण्यास रुचकर लागते. जेवताना तोंडी लावायला म्हणून ताटात हे असतेच. चला तर मग, गोवन खाद्यपदार्थांच्या आजच्या भागात आपण पाहूया सुंगटाचे लोणचे करण्याची आपली गोवन पद्धत.

साहित्य :

  • 200 ग्रॅम ताजी कोळंबी

  • 2 चमचे लाल मिरची पावडर

  • 1/2 चमचे हळद पावडर

  • 1/2 चमचे मीठ

  • मोहरीचे दाणे

  • मेथी दाणे

  • हिंग

  • मिरपूड

  • चिंचेचा कोळ

  • तेल

  • पाणी

कृती :

  • कोळंबी स्वच्छ धुवून घ्या.

  • कोळंबी एका भांड्यात ठेवा आणि त्यात तिखट, हळद आणि मीठ घाला. चांगले मिसळा आणि कोळंबी पंधरा मिनिटे मॅरीनेट होऊ द्या.

  • त्यानंतर पॅनमध्ये सर्व खडे मसाले कोरडेच भाजून घ्या.

  • त्यानंतर त्याची बारीक पावडर करून घ्या.

  • स्वच्छ केलेल्या कोळंबीला ही मसाला पावडर लावा आणि 10 मिनिटे तसेच ठेवा.

  • चिंचेचे तुकडे काही चमचे कोमट पाण्यात दहा मिनिटे भिजत ठेवा. नंतर ते मॅरीनेट केलेल्या कोळंबीमध्ये घाला.

  • एका नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यात एक चमचा मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागल्यावर कोळंबीचे मिश्रणात त्यात घाला आणि सर्व मिश्रण नीट ढवळून घ्या.

  • मॅरीनेट केलेल्या कोळंबीच्या भांड्यात थोडे पाणी घाला आणि ते पानी पॅनमध्ये ओता.

  • आता गॅसची आच कमी करा आणि कोळंबी मऊ होईपर्यंत शिजवा. यासाठी साधारण 10-15 मिनिटे लागतात.

  • कोळंबी शिजली की, थोडेसे चाखून बघा आणि आवश्यक असल्यास आणखी मीठ घाला किंवा आवश्यक असल्यास चिंचेचा कोळ घाला.

  • शेवटी लोणचे पूर्णपणे थंड होऊ द्या. लोणचे पूर्णपणे थंड झाल्यावर एका लहान हवाबंद बरणीत ठेवा.

(टीप: सुंगटाचे लोणचे रेफ्रिजरेटरमध्ये 7-10 दिवस ठेवता येते.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; मग राजकारण्‍यांवर कारवाई का नाही?

Karapur: '..हा अपघात नसून, खुनाचाच प्रकार'! शेकडो नागरिकांची पोलीस स्थानकावर धडक; मशाल मोर्चातून चौकशीची मागणी Video

Goa Nightclub Fire: 'ही दुर्घटना म्हणजे भाजप सरकारच्या भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेले बळी'! हडफडे अग्नितांडवावरून विरोधकांचा हल्लाबोल

IndiGo Flights Update: ‘इंडिगो’ची गोव्यातून 10 विमाने रद्द! सेवा हळहळू रुळावर; प्राधिकरणाने छायाचित्रे केली Viral

Arpora: 'मला पोलिसांनी मंदिरातून उचलले'! हडफडेचे सरपंच कारवाईमुळे संतप्त; भाजपचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करण्याचे केले सूतोवाच

SCROLL FOR NEXT