साहित्य: एक किलो चिकनचे (Chicken) बारीक तुकडे, एक वाटी दही, एक इंच तिखी, चार वेलची, चार लवंग, आडवे बारीक कापलेले पाच मोठे कांदे , बारीक कापलेले चार पिकलेले टोमॅटो (Tomato) , बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या, एक चिकन क्युब पावडर, पुदिनाची बारा पाने, दोन मोठे चमचे अमूल बटर, एक चमचा हळद पूड, दोन चमचे मिरची पूड, दोन लिंबू, एक वाटी तेल, एक मोठा चमचा जिरे, एक मोठा चमचा आलं-लसणाची पेस्ट, दीड कप बासमती तांदूळ, तीन कप पाणी आणि चवीपुरते मीठ.
कृती:
1) दोन कप पाणी आणि पुदिनाची पाने घालून धुवून घेतलेल्या बासमती तांदळाच्या कुकरमध्ये भात शिजवून घ्यावा, जरा कमी शिजवून घ्यावा. म्हणजे तांदूळ एकदम मऊ होता कामा नये. (नेहमीपेक्षा कुकरच्या दोन शिट्ट्या कमी काढाव्यात.)
2) चिकनच्या तुकड्यांना काट्याने टोचून घ्यावे.
3) दही, मीठ, अर्धी मिरची पूड, अर्धी हळदपूड आणि लिंबूरस एकत्र करून ही पेस्ट चिकनच्या तुकड्यांना लावून अर्धा तासपर्यंत मुरत ठेवावे.
4) कढईत तेल घालून मंद आचेवर ठेवावे. त्यात जिरे घालावे परतावे. मग त्यात कांदे घालावे. तांबूस रंग येईपर्यंत परतावे. मग त्यात कांदे घालावे. तांबूस रंग येईपर्यंत परतावे. त्यात आले लसणाची पेस्ट घालावी. हिरव्या मिरच्या घालाव्या परतावे.
5) टोमॅटो घालावे. टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत परतावे. मग तिखी, वेलची आणि लवंग जरा ठेचून घालावे. मग त्यात चिकन घालावे. उरलेली हळद आणि मिरची पूड घालावी. क्यूब पावडर घालावी.
6) मग अर्धा कप पाणी त्यात घालून हे चिकन शिजवून घ्यावे. चवीपुरते मीठ घालून परतावे.
7) मग त्यात भात घालून अलगदपणे एकदाच परतावे. त्यात बटर ओतावे. सगळे एकजीव झाले, की आच बंद करावी. गरम असतानाच ही चिकन बिर्याणी ताटात वाढावी.
सूचना: ही बिर्याणी खायला देतांना त्यावर बारीक कापलेली कोथिंबीर घालून सजवावे. थोडा लिंबूरसही त्यावर शिंपडावा. तसेच काकडीचे काप बाजूने लावावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.