Best Farm Stays in Goa Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Best Farm Stays in Goa: गोव्याच्या पर्यटनाचा आनंद द्विगुनीत करणारे हे टॉप फार्मस्टे माहितीयेत?

तुम्ही जर गोव्यातील या ठिकाणांना भेट दिली नसेल तर एकदा अवश्य द्या.

दैनिक गोमन्तक

Best Farm Stays in Goa: गोवा राज्य हे देशात मुख्यत: पर्यटनासाठी ओळखले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. यामध्ये मग देशातील विविध राज्यातून असो किंवा परदेशातून असो.

गोव्यातील नितळ समुद्राचा मनमुराद आनंद पर्यटक लुटतात. मावळतीच्या सूर्याचा दर्शन, गोवन पदार्थांची चव, विविध सणांचा अनुभव घेण्यासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणात लोक येतात.

पण आज आम्ही तुम्हाला गोव्यातील (Goa) अशा ठिकांणाबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही कधीही पाहिली नसतील. तुम्ही या ठिकाणी कुटूंबासह, मित्र-परिवारासह किंवा जोडीदारासह जाण्याचा आनंद घेऊ शकता, चला तर मग गोव्यातील अशा सुंदर ठिकाणांची सैर करुया...

नंदनवन स्पाइस फार्म

जर तुम्ही उन्हाळ्यात गोव्याला जाण्याचा विचार करत असाल आणि काही तरी अॅडव्हेचर गेम खेळण्याचा विचार करत असाल तर खांडेपार येथील नंदनवन स्पाइस फार्मला नक्की भेट द्यावी.

या ठिकाणी दोन मोठे पूल आहेत.तुम्ही येथे स्विमिंगचा आनंद घेउ शकता. तुम्ही या पुलमध्ये तासनतास घालवू शकता किंवा फक्त फार्ममध्ये फेरफटका मारू शकता आणि विविध मसाले आणि त्यांच्या आश्चर्यकारक औषधीयुक्त फायद्यांबद्दल जाणुन घेउ शकता.

A pool at Nandanvan Spice Farm.

तसेच गोव्यातील सर्वात लांब असलेल्या झिप लाइनिंग सारख्या अॅडव्हेचरचा तुम्ही आनंद घेउ शकता. तसेच ATV राइड करु शकता.हा वॉटरपार्कसारखा अनुभव कुटुंब, सहकारी आणि मित्रांसह एक दिवसीय सहलीसाठी अगदी योग्य आहे. तुम्ही येथे कुटुंब, मित्र-परिवार आणि मोठ्या कॉर्पोरेट ग्रुपसह पिकनिकचा आनंद घेउ शकता.

ठिकाळ: कोडार, ओपा वॉटर वर्क्स जवळ, पणजी-बेळगाव रोड, खांडेपार, गोवा

वेळ: सोमवार ते शनिवार, 24 तास सुरु (रविवारी बंद)

Food

रॉक व्हॅली गोवा

तुम्हाला जर गोव्यात जंगलात राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर रॉक व्हॅली या ठिकाणाला नक्की भेट देउ शकता. येथे तुम्ही लाकडी कॉटेजसह झिप लाइनिंग,इन्फिनिटी पूल, एटीव्ही राइड्स, हाय रोप कोर्स, स्पाइस टूर, पक्ष्यांचे निरीक्षण, व्हॅली वॉक, कयाकिंग, शूटिंग, ह्यूमन गायरो आणि बंजी ट्रॅम्पोलिन यांचा आनंद घेउ शकता. तुम्ही येथील मसाल्याच्या बागेत भटकंती करण्याचा आनंद जोडीदार आणि कुटूंबासह घेउ शकता.

स्थळ: नंदनवन गोवा, ओपा-कोडर रोड, ओपा वॉटर वर्क्स जवळ,फोंडा

संपर्क : 7722016994

वेबसाइट: rockvalleygoa.com

इंस्टाग्राम: www.instagram.com/rockvalleygoaresort

फोर सीझन्स फार्म

तुम्हाला जर नदीकाठी बसुन गारवा आणि वाहत्या पाण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ही इच्छा गोव्यातील फोर सीझन्स फार्ममध्ये पुर्ण होउ शकते.

या ठिकाणी राहण्यासाठी लाकडी निवास स्थान असुन तुम्ही वाहत्या नदीचा खळखळाट ऐकुन निसर्गाचा अविस्मरणीय आनंद घेउ शकता. तुम्‍ही तुमच्‍या कुटुंबासोबत नदीकाठी एक दिवस घालवण्‍याची निवड करू शकता किंवा रात्रभर सहलीला जाण्‍याचा आणि बोनफायर आणि बार्बेक्यूचा आनंद घेऊ शकता.

तुम्ही नदीत कयाकिंगला जाऊ शकता; शांत आणि स्थिर पाणी तुमच्या मनाला शांत आणि आराम देईल.या उन्हाळ्यात तुम्ही फोर सीझन्स फार्ममध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहुन स्व:तचे मन आणि शरीराला प्रसन्न करु शकता.

ठिकाण: रिवोना, दक्षिण गोवा

संपर्क: +91 96730 89696

फेसबुक: www.facebook.com/4seasonfarm

FOUR SEASONS FARM

एनव्ही इको फार्म

गोव्याच्या निर्जन भागात वसलेले आणि आंबे, सुपारी, नारळ आणि अनेक फळबागांच्या लागवडींनी वेढलेले आणखी एक फार्म म्हणजे एनव्ही इको फार्म . हे ठिकाण गजबजलेल्या शहरांपासुन आणि प्रदुषणापासुन दुर वसलेले ठिकाण आहे. या फार्ममध्ये रंगेबिरंगी फुलपाखरांचा पाहण्याचा आनंद घेउ शकता.

मार्च ते मे महिन्यात काजुचा हंगाम असतो.काजुपासुन प्रसिद्ध पेय फणी आणि हुर्राक बनवले जाते. काजूचा रस पारंपारिक पद्धतीने कसा काढला जातो हे पाहता येते.

गोव्याचे स्वादिष्ट खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळते.तसेच अनेक साहसी खेळाचा अनुभव घेता येइल.

स्थळ: Kirlapal, Dabal

वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 6

ईमेल: info@nvecofarm.com/ nimividi@gmail.com

वेबसाइट: www.nvecofarm.com

संपर्क: 919422062703 / 8411026035

AV Eco Farm

मंगल फार्म

गोव्याच्या नेत्रावलीमध्ये एक अविस्मरणीय असे मंगल फार्मस्टे आहे. जेथे तुम्ही भेट देउन आठवणींचा खजिना सोबत घेउन येउ शकता. या फार्ममध्ये तुम्हाला दिले जाणारे घर हे लाकडापासुन बनलेले असणार आहे.

येथे डिलक्स खोल्या, मातीच्या टोनमध्ये, पूर्णपणे शांत, सुसज्ज आणि आराम तसेच विश्रांतीसाठी डिझाइन केल्या आहेत .सुंदर बागांमध्ये फिरण्याचा आनंद घेउ शकता. तसेच येथील गोवन पदार्थांचा आस्वाद घेउ शकता.

स्थळ: मंगल गाव, केपे , दक्षिण गोवा

संपर्क: 9422464264 / 7017454123

वेबसाइट: mangaalfarmstay.com

इंस्टाग्राम: www.instagram.com/mangaalfarmgoa

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: ‘वुमन सेफ्टी अँड सिनेमा’ सत्रात मान्यवरांची ‘सेफ बॅटिंग’! 'पॉवर प्ले आहे पण..', भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT