Ranbhajya  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Wild Vegetables Benefits: त्वचाविकारांसह अनेक रोगांवर गुणकारी आहेत 'या' पावसाळी रानभाज्या; जाणून घ्या यांचे बहुगुणी फायदे

कोणत्याही लागवडीशिवाय, रासायनिक खतांशिवाय मिळणाऱ्या या रानभाज्या गोमंतकियांच्या ताटात मानाचं स्थान निर्माण करत मन तृप्त करताहेत.

Ganeshprasad Gogate

Monsoon Wild Vegetables Benefits For Skin Care: 60 दिवसांची मत्स्यबंदी आणि बारमाही मिळणाऱ्या भाज्यांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना गोवेकरांच्या ताटात काहीशी पोकळी निर्माण झालीय खरी हां पण ती भरून काढण्याचं काम रानभाज्या करताहेत.

कोणत्याही लागवडीशिवाय, रासायनिक खतांशिवाय मिळणाऱ्या या रानभाज्या गोमंतकियांच्या ताटात मानाचं स्थान निर्माण करत मन तृप्त करताहेत.

जैव विविधतेने समृद्ध असलेला गोवा आणि लगतचा कोकणपट्टा पावसाळ्यात जणू मुक्तहस्ते उधळणच करत असतो. पावसाळा सुरू झाला की आठवडाभरातच विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारात दाखल होतात.

वर्षभरातून महिना/दोन महिने उपलब्ध होणार्‍या या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांचा राजभाज्या खरेदीकडे कल असतो.

अळू, तेर, टायकिळा, लुत, कुर्डु, सुलुची भाजी, घोटाशीरेचे आकुर यासारख्या अनेक प्रकारच्या रानभाज्या गोव्यात अगदी चवीनं खाल्ल्या जातात. या भाज्या रुचकर तर असतातच पण पौष्टिकही असतात.

त्यामुळेच या रानभाज्यांना आयुर्वेदिक दृष्ट्या बरेच महत्व असल्याचे वैद्य मारियान लोबो यांनी सांगितले. गोमंतकने लोबो यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी रानभाज्यांची आयुर्वेदिकदृष्ट्या सविस्तर माहिती दिली.

Colocasia Antiquorum

अळू (Colocasia Antiquorum)

काळे अळू भाजीला फार उत्तम आहे. ही भाजी खाल्ल्याने मल व मूत्र साफ होतात. ही भाजी साधारण थंड उष्ण प्रकृतीच्या माणसांस चांगली मानवते. ही भाजी अग्निदीपक आहे. अळू थंड असल्याने थोडा कफ व वायू ही वाढतात व पित्ताचा नाश होतो.

फुरशाच्या विषावर अळूच्या पाल्याचा रस त्यात मिरे घालून दिला जातो. तसेच दंशाचे स्थळीही लावला जातो. याने फुरशाचा विषार कमी होतो. गांधीलमाशी वगैरे विषारी किडे चावले असता, अळू भाजून त्याचा रस काढून दिल्यास व चावलेल्या जागी लावल्यास उपयोग होतो.

Celosia Argentea

कुरडू (Celosia Argentea):-

ही पावसाळ्यात रानात आपोआप उगवणारी वनस्पती आहे. ही माठासारखी आहे. या झाडाचे शेंड्यावर पांढऱ्या रंगाचे झुपके येतात. त्यात काळे बी असते. क्वचित प्रसंगी हिला तांबड्या रंगाची फुले येतात.

मुतखड्यावर याच्याइतके मोठे औषध नाही. कुरडूच्या बिया १ ग्रॅम बारीक कुटून त्यात तितकीच साखर घालून ते दुधातून घ्यावे, लघवीचे विकार बरे होतात..

मुतखड्याची लक्षणे दिसू लागताच कुरडूचे झाडाचे २५ ग्रॅम तुकडे घेऊन त्याचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा करावा व त्यात कुरडूच्या बियांचे चूर्ण (१० ग्रॅम) घालून तो काढा घ्यावा. असे सकाळ संध्याकाळ केल्याने खडा नाहीसा होतो.

Cassia Tora

टाकळा (Cassia Tora)-

टाकळ्याच्या भाजी खाल्ली असता खरूज, अंगास येणारी खाज थांबते. टाकळ्याच्या पानांचे रायते चांगले होते. प्रमेह म्हणजे लघ्वीच्या विकारात टाकळ्याची फुले 10 ग्रॅम, खडीसाखर 10 ग्रॅम घालून सेवन केल्यास आराम मिळतो.

टाकळ्याची पाने वाटून थोडी गरम करून अंगावर आलेल्या फोडांवर बांधली असता वेदना होतात. टाकळ्याची मुळे उगाळून गंधासारखे दाट करून फोड, खरूज यावर लावल्याने लवकर बरे होतात.

दाद म्हणजे गजकर्ण यावर टाकळ्याच्या दिया करंजाचे तेलात वाटून लावल्याने ताबडतोब हमखास बरे होते. टाकळ्याच्या बियांचे वस्त्रगाळ केलेले चूर्ण घेऊन त्यात तितकाच समभाग गंधक घालून करंजाचे तेलात चांगले खलून मलम करून ठेवावे. सर्व प्रकारच्या त्वचाविकारांवर लागू पडते.

Amorphallus Campanulatus

सुरण (Amorphallus Campanulatus)

सुरणाला अर्शघ्न असे म्हणतात. अर्शघ्न म्हणजे मूळव्याधीचा नाश करणारा. सुरणाची भाजी मूळव्याध असलेल्या माणसांनी खाल्ली तर मूळव्याधी बरी होते. सुरणाच्या काचऱ्या (फोडी) पाडाव्या व त्या तुपात तळून खाव्या. याने भूक लागते, अन्न पचते व मूळव्याध बरी होते.

  • सुरणपाक :- सुरणाचा कांदा वाळवून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण करून साजुक तुपावर खमंग भाजावे, त्या चूर्णाच्या दुप्पट चांगली साखर घेऊन त्याचा तीन तारी पाक करावा. त्या पाकात भाजलेले सुरणाचे चूर्ण टाकून वड्या पाडाव्या. ह्याला सुरणपाक म्हणतात. सुरणपाक मूळव्याध झालेल्यांनी खावा, फायदा होतो.

(आयुर्वेद चिकित्सा ही व्यक्तिनुरूप असते. त्यामुळे वर नमूद केलेली औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि देखरेखीखाली घ्यावीत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT