Monsoon Health Care Tips: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी हे उपाय करू शकता.
Monsoon Care Tips
Monsoon Care TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Monsoon Health Care Tips: पावसाळा सुरू झाला असून सर्वत्र थंडगार वातावरण झाले आहे. पण वातावरणातील बदलांमुले अनेक आजार देखील डोकेवर काढतात.

अनेक प्रकारच्या ऍलर्जी आणि संसर्गजन्य रोग वाढू लागतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वातावरणातील ओलाव्यामुळे बॅक्टेरिया-फंगल इन्फेक्शन होऊ शकते. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, अशा लोकांना या आजारांचा सर्वाधिक फटका बसतो. 

म्हणूनच पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ आणि उपायांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जाणून घेऊया पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे.

  • कोमट पाणी प्यावे

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिणे फायदेशीर असते. पावसाळ्यात दुषित पाणी पिल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. यामुळे घशाच्या संसर्गाचा धोकाही कमी होतो.

  •  हळदीचे दूध पावसाळ्यात फायदेशीर

हळदीचे दूध पिणे आरोग्यदायी मानले जाते. कोमट दुधात चिमूटभर हळद मिक्स कगुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. यामुळे रात्रीची झोप सुधारते आणि वेदना आणि थकवा दूर होतो.

Monsoon Care Tips
Kitchen Tips: चिंता नको! केवळ 8 रूपयांमध्ये स्वच्छ होईल किचनमधील चिमणी
  • फळांचे सेवन

पावसाळ्यात फळांचा आहारात समावेश करावा. फळ खाणे आरोग्यासाटी फायदेशीर असते.फळांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. सफरचंद, संत्री, केळी, पपई यासारखे फळ खावी.

  • लवंग-मिरपूड आणि दालचिनीचा काढा

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा रामबाण उपाय म्हणून काम करतो. पावसात इन्फेक्शनचा धोका खूप वाढतो, अशा वेळी डेकोक्शनचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि तुळशीच्या पानांपासून बनवलेला काढा तयार करून प्यावा. यामुळे घसा खवखवणे आणि अशा इतर समस्या दूर होतील आणि शरीर रोगांशी लढण्यासाठी मजबूत होईल.

  • तांब्याच्या भांडयातील पाणी पिणे

आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे चांगले असते. विशेषतः पावसाळ्यात तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावे. तांबे तुमच्या पिण्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणतात.

Monsoon Care Tips
Monsoon Wild Vegetables Benefits: 'या' पावसाळी रानभाज्यांचा आहारात समावेश करा,मिळतील बहुगुणी फायदे

पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळावे

  • पालेभाज्या

कोबी किंवा पालक हिरव्या पालेभाज्या पावसाळ्यात खाऊ नयेत. कारण त्यात बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव आढळतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.निरोगी राहायचे असेल तर पावसाळ्यात पालेभाज्या खाणे टाळले पाहिजे.

  • तळलेले पदार्थ

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला अपचन आणि डायरियाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

Monsoon Care Tips
Monsoon Wild Vegetables Benefits: त्वचाविकारांसह अनेक रोगांवर गुणकारी आहेत 'या' पावसाळी रानभाज्या; जाणून घ्या यांचे बहुगुणी फायदे
  • दुग्धजन्य पदार्थ

दही खाणे चांगले असते. पण पावसाळ्यात दही, ताक यासारखे दुग्धजन्य पदार्थ रोजच्या रोज टाळावेत. कारण पावसाळ्यात अन्नपदार्थांमध्ये बॅक्टेरिया फार लवकर वाढतात आणि दह्यात आधीच बॅक्टेरिया असतात. जर तुम्ही हे रोज म्हणाल तर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात.

  • कोशिंबीर

कोशिंबीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी पावसाळ्यात कच्च्या भाज्या खाल्ल्याने आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. काही भाज्यांमध्ये बॅक्टेरिया असतात, जे कच्चे खाल्ल्यास संसर्गाचा धोका वाढतो. पावसाळ्यात फक्त शिजवलेले अन्नच खावे.

  • सीफूड

पावसाळ्यात सीफूडपासून दूर राहा कारण ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. पावसाळ्यात माशांचा प्रजनन हंगाम असून बाजारात उपलब्ध असलेले मासे ताजे नसतात. हे फ्रिज किंवा साठवणुक करुन ठेवलेले असतात. यामुळे याचे सेवन करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

  • जंक फूड

पावसाळ्यात जंक फूडपासूनही दूर राहिले पाहिजे. स्ट्रिट फूड खाल्यास मलेरियाचा धोका खूप वाढू शकतो. या दिवसांमध्ये पचनक्रिया मंदावते. म्हणून इडली,डोसा,जलेबी,दही वडा असे आंबवलेले पदार्थ खाणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com