Palolem Nagarse: कोमुनिदादच्या जागेत घातले कुंपण, जमीन हडपण्याचा प्रयत्न; नगर्से-पाळोळेतील नागरिक संतप्त

Palolem Nagarse Comunidade Land: नगर्से-पाळोळे कोमुनिदादची जवळ जवळ ५ लाख चौरस मीटर जागा हडप करण्याचा प्रयत्न चालू आहे व त्यामुळे तेथील नागरिकांत असंतोष वाढत आहे. या जमिनीत कित्येक काजूची झाडे आहेत.
Palolem Nagarse Comunidade Land
Palolem Nagarse Comunidade LandDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: एका व्यक्तीने पाळोळे-नगर्से कोमुनिदादची ५ लाख चौ.मी. जागा हडप करण्याचा प्रयत्न केला असून ती जागा तो विकण्याच्या प्रयत्नात आहे. या जमिनीच्या सभोवताली कुंपण बांधल्याने या कुटुंबातील लोकांना आत जाता येत नाही. त्यामुळे काजूमुळे त्यांचे होणारे उत्पन्न व मिरची लागवड बंद झाली आहे, ही माहिती माजी नगराध्यक्ष संतोष गावकर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

नगर्से-पाळोळे कोमुनिदादची जवळ जवळ ५ लाख चौरस मीटर जागा हडप करण्याचा प्रयत्न चालू आहे व त्यामुळे तेथील नागरिकांत असंतोष वाढत आहे. या जमिनीत कित्येक काजूची झाडे आहेत.

गेल्या कित्येक दशकांपासून शंभरपेक्षा जास्त कुटुंबातील लोक तिथे जाऊन काजू गोळा करीत, काहीजणांनी तिथे मिरची लागवड सुद्धा केली आहे. या पत्रकार परिषदेला विकास भगत, माजी नगराध्यक्ष सुचिता गावकर, प्रभाकर कोमरपंत तसेच कुटुंबातील प्रतिनिधी उपस्थित होते.

Palolem Nagarse Comunidade Land
Power Cut Issue in Palolem: सततच्या विजेच्या लपंडावामुळे पाळोळेतील रहिवाशी संतप्त; वीज विभागात नागरिकांची धाव

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या जमीन हडप करण्याच्या प्रयत्नांत कोमुनिदादचे पदाधिकारी सामील असल्याचेही त्यांनी सांगितले. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई जेव्हा काणकोणात आले होते, तेव्हा या जमीन हडप प्रकरणाची माहिती त्यांना देण्यात आली होती.

Palolem Nagarse Comunidade Land
Canacona: चार रस्ता-आगोंद रस्ता देतोय अपघातांना आमंत्रण; वाहनचालक त्रस्त, ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी

त्यांनी हा विषय विधानसभेतही उपस्थित केला आहे. स्थानिक आमदार व सभापती रमेश तवडकर यांच्या कानावरही हे प्रकरण घातले आहे. मात्र, त्यांनी न्यायालयातून स्थिगिती आणण्याचा सल्ला दिला, असेही यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com