Bungee Jumping In Goa: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bungee Jumping In Goa: तुम्हाला माहित आहे का? ऋषिकेश नंतरचे भारतातील दुसरे 'बंजी जंपिंग' ठिकाण आहे गोव्यात

Bungee Jumping In Goa: गोवा हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळ (GTDC) यांनी जंपिन हाइट्स, असोसिएशन विथ गोवा टुरिझमने 2019 मध्ये उत्तर गोव्यात भारतातील ऋषिकेश नंतर दुसरे बंजी जंपिंग ठिकाण यशस्वीरित्या स्थापित केले.

Shreya Dewalkar

Bungee Jumping In Goa: गोवा हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. गोवा सरकारचा पर्यटन विभाग आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ (GTDC) यांनी जंजंपिन हाइट्स, असोसिएशन विथ गोवा टुरिझमने 2019 मध्ये उत्तर गोव्यात भारतातील ऋषिकेश नंतर दुसरे बंजी जंपिंग ठिकाण यशस्वीरित्या स्थापित केले.

हे उत्तर गोव्यातील मये तलाव येथे असून 55 मीटर उंचीचा हा बंजी जंपिंग प्लॅटफॉर्म उभा आहे. याठिकाणी  4110/- रूपयात तुम्ही बंजी जंपिंग करू शकता. तुम्हाला तुम्ही केलेल्या बंजी जंपिंगचा व्हीडीओ देखील या ठिकाणी मिळतो.

याठिकाणी येण्यासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. जंपिन हाइट्स ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या बंगी सुरक्षिततेच्या मानकांचे पालन करतात तसेच न्यूझीलंडमधील तज्ञांच्या अंतर्गत प्रशिक्षित जंप मास्टर्स या ठिकाणी आहेत.

मला अत्यंत आनंद होत आहे की गोवा टुरिझम गोव्याला भारतातील एक प्रीमियम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी, विशेषतः साहसी पर्यटनासाठी अथक प्रयत्न करत आहे. आज बंजी जंपिंगचा शुभारंभ आणि मये सरोवराच्या सुशोभीकरणामुळे राज्याच्या पर्यटनाच्या कॅपमध्ये आणखी भर पडली आहे.

केंद्र सरकार गोव्याला पर्यटनाच्या उद्देशाने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीसह मदत करत आहे आणि येत्या काही महिन्यांत गोव्यात पर्यटन पायाभूत सुविधा, नवीन पर्यटन उपक्रम आणि प्रकल्पांचा मोठा विकास होणार आहे. असे गोव्यात बंजी सेवेच्या शुभारंभप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले होते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT