Goa Handicraft  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

संत गोरोबाशी नाते सांगणारा माती हस्तकारागिरीचा व्यवसाय..

हा माती हस्तकारागिरीचा व्यवसाय अलीकडच्या काळात पुन्हा उभारी घेतो आहे.

दैनिक गोमन्तक

मातीला आकार...

संत गोरोबा कुंभार मनोभावे मातीतून कारागिरी करायचे. संत गोरोबाशी नाते सांगणारा हा माती हस्तकारागिरीचा (Goa Handicraft ) व्यवसाय अलीकडच्या काळात पुन्हा उभारी घेतो आहे. दिपावलीच्या दिवसात ह्या व्यवसायाची खरी कसोटी असते. नवनवीन आकार व रचना असलेल्या पणत्या, देवासमोर लागणारे दिवे आदी वस्तूंच्या निर्मितीचा हाच काळ असतो.

हरमल येथील देऊळवाडा, शेटकरवाडा भागांतील जनार्दन शेटकर ह्या युवकाने या परंपरागत मातीच्या कामात स्व:ताला झोकून दिले आहे. तो म्हणतो, आपण कुंभार समाजातला असल्याने मातीच्या सान्निध्यात व मातीच्या कलाकलानेच आपण घडत गेलो. घरच्या शेतीप्रमाणेच हा व्यवसायदेखील फार फायदेशीर नसला तरी चरितार्थचे साधन म्हणून सांभाळत गेलो आहे. या कोविडकाळात त्याला बहर आला. फावला वेळ भरपूर मिळाला. त्यामुळे वेळेत कित्येकांच्या ऑर्डर्स पुर्या करण्यासाठी आणि विक्रीसाठी वस्तू तयार करण्यासाठी त्याला शक्य झाले.

अलीकडेच गोवा खादी व हस्तकला महामंडळाकडून मातीच्या वस्तू तयार करण्यासाठी त्याने मशीन घेतले आहे. स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून तो आता आपला हा पारंपरिक व्यवसाय जोपासत आहे.

नवीन माहिती मिळवून अनेक नव्या वस्तू तयार करणे त्याने शिकून, विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. जनार्दन म्हणतो, सरकारकडून सबसिडी मिळाल्याने हा व्यवसाय आता त्याच्या कुटुंबासाठी चरितार्थाचे चांगले साधन बनले आहे. अन्यथा ह्या व्यवसायातून व्याज, मुद्दल भरण्यातच संपूर्ण मिळकत खर्ची जात असे.

या व्यवसायाला लागणाऱ्या कच्च्या मालाची उपलब्धता स्थानिक ठिकाणी नाही. विशेषतः माती दोडामार्ग, डिचोली आदी ठिकाणांहून आणावी लागते. त्यामुळे आर्थिक भार मोठ्या प्रमाणात पेलावा लागतो. वेळेचाही अपव्यय होतो. त्यानंतर मातीवर करण्यात येणारी प्रक्रिया हाही गुंतागुंतीची विषय असतो. ठराविक वेळेत मातीच्या गुणधर्मात आवश्यक कणखरपणा, टिकाऊपणा आणि दर्जा सांभाळण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. आठ ते दहा दिवस त्यासाठी खर्च होतात.

स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असल्याने हा व्यवसाय सणासुदीच्या तसेच लग्नाच्या मोसमात किफायतशीर असतो. लग्नसराईत करे (छोटी मडकी) व मातीची भांडी यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. दर वाजवी असल्यास ग्राहक अगत्याने खरेदी करतो. मात्र गाडीतून दूर ठिकाणी माल विक्रीसाठी नेणे प्रवासखर्चामुळे नुकसानीचे ठरते. प्रवासात आदळआपटीने भांडी फुटूनही नुकसान होते त्यामुळे स्थानिक बाजारात किंवा घरीच मातीच्या सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवणे व्यवहारीक ठरते. - चंद्रहास दाभोलकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR Campaign In Goa: गोव्यात 'एसआयआर' मोहिमेला सुरुवात; बूथ लेव्हल अधिकारी करणार डोर-टू-डोर सर्व्हे; डॉक्युमेंट तयार ठेवण्याचे मतदारांना आवाहन

गोव्यातील 'त्या' भीषण अपघातात अखिल भारतीय सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ खेळाडुचा मृत्यू

Pakistan Supreme Court Blast: पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा धमाका! 12 जण गंभीर जखमी; स्फोटाचे नेमके कारण काय?

Yashasvi Jaiswal Century: दक्षिण आफ्रिकेची 'डोकेदुखी' वाढली! कसोटी मालिकेपूर्वी यशस्वी जयस्वालचा 'मास्टरस्ट्रोक', ठोकलं शानदार शतक

Horoscope: मालामाल व्हा! कार्तिक पौर्णिमेला राशीनुसार दान करा 'या' वस्तू; देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल

SCROLL FOR NEXT