Wedding Destination ला जाण्यापूर्वी 
या गोष्टी लक्षात ठेवाव्या
Wedding Destination ला जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्या Dainik Gomantak

Wedding Destination ला जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्या

वेडिंग डेस्टिनेशनला जाण्यापूर्वी काही विशेष गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.
Published on

डेस्टिनेशन वेडिंगचा सध्या खूप ट्रेंड सुरू आहे. पूर्वी असे होते की फक्त श्रीमंत लोकच किंवा बॉलीवुड सेलिब्रेटीच असे लग्न करत असे. परंतु आता सामान्य लोकांसाठी देखील हे सामान्य झाले आहे. रितीरिवाज आणि परंपरांचे पालन करून नवीन ठिकाणी लग्न करणे हा नक्कीच सर्वांसाठी अविस्मरणीय क्षण असेल. डेस्टिनेशन वेडिंगचा आनंद केवळ वधू-वरच नाही तर पाहुणेही घेतात. तुम्ही जर भारतापासून दूर डेस्टिनेशन वेडिंगला जात असाल तर काही गोष्टीची काळजी घ्यायला हवी.

* तिकीट बूकिंग

डेस्टिनेशन वेडिंगमध्ये इनविटेशन आधीच पाठवली जातात. जर तुम्हाला देखील इनविटेशन मिळाले असेल तर लवकर तिकीट बूक करावे. कारण वेडीग सीझनमध्ये तिकीट महाग होत असल्याने आपल्याला अधिक पैसे मोजावे लागतील. तसेच, अनेक ट्रॅवल साइट्सवर ओफर्स देखील येत असतात. म्हणून बूकिंग करण्याआधी अनेक साईट तपासावे.

Wedding Destination ला जाण्यापूर्वी 
या गोष्टी लक्षात ठेवाव्या
Hearty Brunch: गोव्यातील हे 4 कॅफे तुम्हाला माहिती आहेत का?

* आवश्यक वस्तु

लग्नाची तयारी करत असतांना फक्त कपडे, दागिने आणि शूज याशिवाय तुमच्या प्रथमोपचार किट, चार्जर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक आवश्यक गोष्टी सोबत ठेवण्याची गरज असते. तसे तर तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच वस्तु मिळतील, परंतु स्वत:साठी थोडी तयारी करणे चांगले आहे.

* मौसम

लग्नाची खरेदी सुरू करण्यापूर्वी डेस्टिनेशन वेडिंगच्या हंगामची माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणचे वातावरण वेगवेगळे असते. त्यानुसार आपली तयारी करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com