Goa Culture Feni is valuable for Goa  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

ऑल अबाउट ‘वारसा’

खरंतर फेणी ही गोव्याची मूल्यवान ओळख आहे पण अलीकडच्या वर्षात विदेशी ब्रँडच्या भपक्यात आणि गदारोळात फेणीदेखील बदनाम होत गेली आहे.

दैनिक गोमन्तक

बालपणी पोटात दुखल्यावर आई चमच्यात फेणी (Feni) घेऊन जाळायची. त्या द्रव्यावरची नीळी ज्योत विझल्यावर चमच्यामधली ती फेणी औषध म्हणून पोटात जायची किंवा सर्दी झाल्यावर ती कधीकधी छातीवरही चोळली जायची(Goa Culture) . ‘दारू’ म्हणून फेणीची ओळख फार नंतरची. खरंतर फेणी ही गोव्याची मूल्यवान ओळख (Feni is valuable for Goa) आहे पण अलीकडच्या वर्षात विदेशी ब्रँडच्या भपक्यात आणि गदारोळात फेणीदेखील बदनाम होत गेली आहे.

नंदन कुडचडकर जगभर फिरतो. स्कॉटलंड किंवा दक्षिण आशियात त्याने तिथली स्थानिक पेये कशातऱ्हेने फरमेंट करून बनवली जातात आणि हाताळली जातात ते पाहिले. नंदन म्हणतो, ‘आपल्या फेणीशी आपण त्याची तुलनाच करू शकत नाही. फेणी ही गोव्याला मिळालेली नैसर्गिक भेट आहे- अ प्राईस्ड पझेशन!’ फेणीच्या निर्मितीचा काळ आणि पद्धत पोर्तुगीज राजवटीच्या सुरुवातीपासूनची आहे. नंदनने फेणीचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व ओळखून तिला आपल्या ‘ऑल अबाऊट अल्कोहोल’ या संग्रहालयात विशेष स्थान दिले आहे.

नंदनच्या मते, बॉलिवुडच्या सिनेमातून गोव्याचे आणि गोमंतकीयांचे बदनामीकारक दर्शन ज्याप्रकारे केले जाते ते निषेधार्ह आहे. गोमंतकीय हा देशाच्या इतर कुठल्याही नागरिकांप्रमाणेच सजग आणि जबाबदार माणूस आहे. फेणीचा संदर्भ जोडून गोमंतकीयांना नकारात्मक बाजेत दाखवले जाते. नंदनला लोकांना हेच दाखवून द्यायचे होते की गोव्याच्या संपन्न संस्कृतीचा आणि वारसाचा एक भाग फेणीदेखील आहे. ‘आणि हे सारे एका सर्जनशीलतऱ्हेने आपल्याला दाखवायचे होते. नाहीतर गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना कसे कळेल?’ फक्त फेणीच नव्हे, तर ती बनवताना वापरण्यात येणाऱ्या काचेच्या नळ्या, फेणी जमा करून ठेवण्यात येणाऱ्या काचेच्या बरण्या, फेणीसंबंधीच्या इतर वस्तू याचे आकर्षक कलेक्शन या संग्रहालयात आहे.

पंधराव्या, सोळाव्या शतकातल्या या वस्तू भारत आणि जगभरातून फेणीच्या निर्मितीसाठी गोव्यात आणल्या गेल्या होत्या. चर्चमध्ये असणारी ‘पवित्र वाईन’ ही देखील या संग्रहालयाचा भाग आहे. गोव्याच्या या वारसालाही नंदनने अभिमानाने तिथे स्थान दिलेले आहे.

नंदनकडे या काचेच्या वस्तू आणि कलाकृतींचे मोठे भांडार होते. नंदन सांगतो की त्याला त्याच्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून अशा वस्तू जमवण्याचा छंद लागला. भविष्यात हे सारं आपल्याला सामान्यपणे पाहायला मिळणार नाही याची कल्पना त्याला होती. ‘आमच्याकडे काय होतं’ याचे दर्शन पुढच्या पिढीला घडवणे हे खूप महत्त्वाचे आहे असे त्याला वाटले. संग्रहालयात असणारे काही काचसामान तर फार नाजूक आहे. काही वस्तू शतकांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे फार काळजीपूर्वक त्यांची रचना या संग्रहालयात करावी लागली.

‘ऑल अबाउट अल्कोहोल’ हे संग्रहालय अस्तित्वात येऊन केवळ दोन महिने झाले आहेत पण त्याचा बोलबाला इतका आहे झाला आहे की 300 ते 400 लोक दर दिवशी या जागेला भेट देतात. हे नंदनला देखील अनपेक्षित होते.

या संग्रहालयाला भेट देण्यासाठी सुरुवातीला कुठलेही शुल्क आकारले जात नव्हते. लोकांनी यावे, बघावे आणि गोव्याच्या एका परंपरेविषयी जाणून घ्यावे हाच हेतू होता. पण नंतर गर्दीवर अंकुश ठेवण्यासाठी एक नोव्हेंबरपासून शुल्क आकारणे त्यांनी सुरू केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT