गोव्याच्या ‘शीत कढी’ला मिळणार GI नामांकन

बेबींका, आगशीची वांगी, सात शिरांची भेंडी आणि अळसांदेही जाणार भौगोलिक संकेताच्या सूचीत
Goan Shit Kadhi will get GI nomination
Goan Shit Kadhi will get GI nominationDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : गोव्याची काजू फेणी आणि खोलाची मिरची यांना यापूर्वीच भौगोलिक संकेत मिळालेले असतानाच आता गोव्याची प्रसिद्ध ‘शीत कढी’ आणि बेबींका (प्रसिद्ध ख्रिस्ती मिठाई) यांनाही हा संकेत मिळावा यासाठी गोवा राज्य अभिनव मंडळाने प्रक्रिया सुरू केली आहे.

गोवा राज्य अभिनव मंडळाचा 2020-21 चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. ‘शीत कढी’ आणि ‘बेबींका’ यांच्यासह ताळगाव व आगशीची वांगी, कोरगुट तांदूळ, माडाची फेणी, सात शिरांची भेंडी आणि अळसांदे या वस्तूंना जीआय नामांकन मिळावे यासाठी फायलिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. गोव्यातील ‘काटेकणगा’ही या सूचित यावीत यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत.

Goan Shit Kadhi will get GI nomination
Goan Food: जाणून घ्या फोण्ण फोवची रेसिपी

या मंडळाचे सदस्य सचिव लेव्हीन्सन मार्टिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील सर्व गोव्यातील खास वस्तू असून त्यांना नामांकन मिळावे आणि जागतिक पातळीवर त्यांना स्थान मिळावे यासाठी हा प्रयत्न सुरू केला आहे. गोव्याच्या कुणबी साडीलाही हे नामांकन मिळवून देऊन या साडीला साता समुद्रापार नेण्याची आमची कल्पना आहे, असे त्यांनी सांगितले.

गोव्याच्या काजू फेणीला 2007 साली नामांकनाची संधी मिळाली होती. त्यानंतर 2017 साली त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. यानंतर काजू फेणी विदेशात निर्यात करण्याची संधी गोव्यातील उत्पादकांना मिळाली. 2019 साली खोला मिरचीला हे नामांकन प्राप्त झाले होते. गोव्याचे खाजे, मयंडोळी केळी व हरमलच्या मिरचीला हे नामांकन मिळावे यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच त्यांनाही हा मान मिळणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Goan Shit Kadhi will get GI nomination
गोव्यात दिवाळीत फराळापेक्षा पोह्यांना मोठं महत्त्व

गोव्याची ‘फिश करी’ जगात सगळीकडेच प्रसिद्ध आहे. मात्र, तिला जर नामांकन मिळाले तर त्यावर शिक्कामोर्तब होऊन त्याचा गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांना बराच फायदा होऊ शकतो.

- लेव्हीन्सन मार्टिन्स, गोवा राज्य अभिनव मंडळाचे सदस्य सचिव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com