नानोडा बांबर येथील मराठे कुटुंबाचा गणपती (Goa) Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa: साठ जणांचा परिवार पुजतो 11 दिवसांचा गणपती

नानोडा बांबर येथील मराठे कुटुंबाची नववी पिढी कार्यरत

Dainik Gomantak

Goa: सत्तरी (Sattari) तालुक्यातील नानोडा बांबर गावातील मराठे कुटुंबियांचा अकरा दिवसांचा गणपती (Marathe Family Ganapati) उत्सव साजरा केला गेला. या मराठे कुटुंबात एकूण साठ सदस्य आहेत. गणेशचतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवसात एकत्र जमून हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. सर्व कुटुंब नोकरी व्यवसायासाठी गोव्यात वेगवेगळ्या भागात विखुरलेले असले तरी या उत्सवासाठी मूळ घरी एकत्र येतात. सध्या 9वी पिढी मूळ घराण्यात कार्यरत आहे.

गणपतीकडे आरती करताना मराठे कुटुंब

पहिल्या दिवशी गणपतीचे विधिवत पूजन

सतत दहा दिवस अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. फुगड्या, भजन, घुमट आरत्या, रांगोळ्या, माटोळीला लागणाऱ्या फळांची संख्या, नृत्य , संगीत या कार्यक्रमाची रेलचेल होती. गणपतीच्या दहाव्या दिवशी सत्यनारायण पूजा तसेच गणपती पुरश्चरण या विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उत्सवाच्या चार दिवस अगोदर सर्व मंडळी एकत्र जमतात. घरातील पुरुष साफसफाई, रंगरंगोटी, माटोळी सजवणे, मकर सजावटीचे काम करतात. यात प्रामुख्याने सुनील, पंकज, प्रशांत, प्रवीण, समीर, मोहन, गौरव, अंजन, गजानन आदी मराठे बांधवाचा समावेश असतो. करंजा, मोदक, लाह्या असे अनेक फराळचे पदार्थ घरातील महिला करतात.

दरवर्षी धार्मिक कार्यक्रम पौरोहित्य श्रीधर वझे यांच्या मार्गदर्शनाखाली

सत्तरी व सत्तरी बाहेरील अनेक लोक या अकरा दिवसांच्या गणपतीच्या दर्शनासाठी येतात हे विशेष. दरवर्षी धार्मिक कार्यक्रम पौरोहित्य श्रीधर वझे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतो.दरवर्षी साटरे,कोदाळ, देरोडे गावातील लोक सातव्यादिवसानंर दररोज भजनाचे कार्यक्रम सादर करतात यंदा कोवीड मुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. विठ्ठल गावस , नितेश देसाई ,महेश गावस हार्मोनियम, शैलेश शिरोडकर तबला यांच्या तर्फे यंदा भक्ती गीते व भजने सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला. नव्या पिढीपर्यंत चालणारा हा वारसा असाच पुढे रहावा व हा गणपती उत्सव असाच उत्सवात साजरा करण्यासाठी गणपती बाप्पा सर्वांना चांगली शक्ती बुद्धी देवो हिच गणरायाशी प्रार्थना करुन प्रत्येक जण पुढच्या चतुर्थीला भेटण्याची इच्छा मनात धरुन घरातून बाहेर पडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT