Ayurvedic Medicine Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ayurvedic Medicine: थंडीच्या दिवसातील सर्दी-खोकल्याची समस्या करा दूर, 'हे' आहेत रामबाण उपाय

सर्दीवर तुम्ही आयुर्वेदिक उपचार करू शकता, जे अतिशय सोपे आणि घरगुती आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

सध्या थंडी सुरु झाली आहे. बऱ्याच जणांना थंड वातावरणात सर्दी, कफ याची समस्या जाणवत असते. सध्या सर्दीवर तुम्ही आयुर्वेदिक उपचार करू शकता, जे अतिशय सोपे आणि घरगुती आहेत. त्यातल्या त्यात लवंग चहा घेणे फायदेशीर ठरते. लवंग हि उष्ण गुणांची असल्याने थंडीच्या दिवसात लवंगाचे सेवन करणे लाभदायक ठरते. लवंग ही एक औषधी वनस्पती आहे जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज मिळते.

जेवणाची चव वाढवण्यासाठी लोक लवंग वापरतात. याशिवाय लवंगात अँटीसेप्टिक, अँटीवायरल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म देखील असतात, जे तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे देतात. लवंग चहा बनवण्याची रेसिपी खालील प्रकारे आहे. लवंगाच्या चहाचे सेवन केल्याने सर्दी-खोकला, घसा खवखवणे आणि नाक बंद होण्यासारख्या समस्यांपासून त्वरित आराम मिळतो.

लवंगाचा चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य.  

3 लवंगा आणि 1 कप पाणी

लवंग चहा कसा बनवायचा?

लवंग चहा बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक कप पाणी घाला. मग त्यात लवंगा टाकून नीट उकळा. यानंतर, किमान 3-5 मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा.  नंतर तयार चहा एका कपमध्ये गाळून घ्या. आपण आपल्या चवीनुसार मध देखील घालू शकता. 

लवंगचे आणखी काही फायदे-

लवंग दिसायला अगदी छोटीशी असली तरी त्याचे औषधी गुणधर्म खूप आहेत. अनेक आजार आहेत ज्यावर औषध म्हणून आयुर्वेदात घरगुती पदार्थ मग त्यात मसाले असो किंवा इतर अन्नपदार्थ यांचा रामबाण उपाय म्हणून वापर सांगण्यात आला आहे. सायनसपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. सायनस असणाऱ्यांनी रोज 3-4 चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घेऊ शकता. त्यामुळे इंफेक्‍शन दूर होईल आणि श्वास घेताना होणार त्रास कमी होईल.

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्‍शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. लवंगात असलेल्या अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि लवंगातील गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते.

लवंगाच्या तेलात अ‍ॅँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्सपासून सुटका मिळण्यास याचा फायदा होतो.  लवंगाचा लेप देखील तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. तसेच आजकाल टुथपेस्टमध्ये लवंग हा प्रमुख घटक असतो. याचे कारण म्हणजे दातांचे दुखणे दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. दात खूप दुखत असल्यास कापसावर लवंगाचे तेल घेऊन ते दुखत असलेल्या दाताला लावा. दातदुखी कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: शाळेच्या गणवेशात घरातून पळाला, बेपत्ता मुलगा रत्नागिरीत सापडला; 'मत्स्यगंधा एक्स्प्रेस'चा टीसी ठरला देवदूत

Asia Cup Rising Stars 2025: भारताचे फायनलचे स्वप्न भंगले, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशने मारली बाजी; भारतीय खेळाडूंनी केली निराशा VIDEO

Goa History: कुशावती गाळाने भरली, गोव्यातील कदंब राजकर्त्यांनी चांदोर येथून जुवारी नदीकिनारी राजधानी नेली..

Tejas Fighter Jet Crash: दुबई एअर शोमध्ये 'तेजस' लढाऊ विमान कोसळले; दुर्घटनेत वैमानिकाचा दुर्देवी मृत्यू

AUS vs ENG 1st Test: ॲशेसमध्ये 100 वर्षांतील सर्वात मोठा रेकॉर्ड! स्टार्क-स्टोक्सच्या माऱ्यापुढे फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी 19 विकेट्स VIDEO

SCROLL FOR NEXT