Hiking and Trekking Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hiking and Trekking: हायकिंग अन् ट्रेकिंगमध्ये काय फरक आहे? वाचा एका क्लिकवर

बर्‍याचदा लोक हायकिंग आणि ट्रेकिंगला सारखं मानतात, परंतु तुम्हाला त्यांच्यातील फरक माहित असणे आवश्यक आहे.

Puja Bonkile

ज्या लोकांना आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटी करायला आवडते त्यांना अनेकदा हायकिंग किंवा ट्रेकिंग करायला आवडते. या दोन्ही गोष्टी नक्कीच खूप मजेशीर आहेत. पण या दोघांमधला फरक अनेक लोकांना माहीत नाही. ते हायकिंग आणि ट्रेकिंग या दोन्ही गोष्टी समान मानतात आणि हे दोन शब्द एकमेकांना वापरतात. या दोन्ही मजेशीर अ‍ॅक्टिव्हिटी आहेत यात शंका नाही. पण तरीही तुम्हाला या दोघांमधला फरक समजून घ्यायला हवा.

रस्त्यामध्ये फरक आहे

हायकिंग आणि ट्रेकिंगचे रस्ते यात खूप फरक आहे. हायकिंगच्या तुलनेत ट्रेकिंगमध्ये ट्रेक हे जास्त आव्हानात्मक असतात. यामध्ये लोकांना खडबडीत रस्त्यावरून, उंचावर आणि दुर्गम भागात जावे लागू शकते. अशावेळी त्यांचा फिटनेस लेव्हल चांगला असणं खूप गरजेचं आहे.

उद्देश वेगळा

हायकिंग आणि ट्रेकिंगमागचा उद्देशही वेगळा असतो. जिथे हायकिंग एक मनोरंजक अॅक्टिव्हिटी म्हणून पाहिले जाते. जिथे लोक निसर्गाच्या सानिध्यात राहून काही उत्तम अॅक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतात. त्याच वेळी, ट्रेकिंग एक अॅडव्हेचर्स अॅक्टिव्हिटी आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो.

वेगवेगळ्या वस्तूंची गरज

तुम्ही हायकिंग किंवा ट्रेकिंगला जाता तेव्हा तुमचे बॅकपॅकिंगही खूप महत्त्वाचे असते. सर्वसाधारणपणे, तुम्हाला आरामदायक फुटवेअर, हवामानासाठी योग्य कपडे, बॅकपॅक आणि हायकिंग पोलची आवश्यकता असू शकते. पण ट्रेकिंग दरम्यान तुम्हाला अनेक प्रकारच्या सामानाची गरज असते. भूप्रदेशानुसार तुम्हाला रात्रभर कॅम्पिंग आवश्यक गोष्टी आणि काहीवेळा आणखी काही वस्तु घेऊन जावे लागेल.

वेळेचा फरक

जिथे हायकिंग हा प्रत्यक्षात फक्त एक दिवसाची अॅक्टिव्हिटी असते. सहसा, हायकिंग करताना, तुम्ही संध्याकाळी परतता. तर, ट्रेकिंग ही अनेक दिवसांची सहल आहे. ज्यामध्ये तुम्ही कॅम्पसाईट्सवर रात्रभर मुक्काम करता किंवा जागा शोधून कुठेतरी मुक्काम करता. यासाठी तुम्हाला बराच वेळ लागू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

SCROLL FOR NEXT