Gauri Pujan 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gauri Pujan 2022: आली गं गौरीई आली, गौराई पूजनाची जाणून घ्या पद्धत

Gauri Pujan 2022: मोठ्या जल्लेषात यंदाचा गणेशोत्सव पार पडत असुन घरोघरी गौरी आगमनानंतर आज गौरी पूजनाचा दिवस आहे.

दैनिक गोमन्तक

देशात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह साजरा होत आहे. आज गौराई पूजनाचा दिवस आहे. शनिवारी 3 सप्टेंबरला गौरा आवाहनानंतर दुसऱ्या दिवशी आज 4 सप्टेंबरला गौर पूजनाचा दिवस आहे. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन केले जाते. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरीपूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. गौरी किंवा महालक्ष्मीचं पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केलं जातं, म्हणूनच याला ज्येष्ठागौरी असंही म्हटलं जातं

ज्येष्ठा गौरीचं व्रत

गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरीपूजनला (Gauri Pujan 2022) काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन म्हणतात. गौराईचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असंही संबोधले जाते.

विदर्भ, मराठवाड्यासह काही ठिकाणी महालक्ष्मींचे मुखवटे ठेवले जातात. विदर्भात खास करून गौरीला महालक्ष्मी असे म्हणतात. याशिवाय काही ठिकाणी तेरड्याची गौर असते. विविध भागात गौरीपूजनाच्या, मांडणीच्या पद्धतीत आधुनिकता दिसून येते. गौरीसह त्यांची मुलेही मांडतात. तर काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी असतात. म्हणजेच घरातील पाच धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते.

गणपती बाप्पाच्या (Ganpati Bappa) आगमनानंतर गौरीचं स्वागत जातं. गौराईचं माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. यंदा भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरीचे आगमन झाले आहे. माहेरवाशीण गौराईसाठी गोडाधोडाचा बेत करुन तिचा पाहुणचार केला जातो, यालाच गौरी पूजन असे म्हणतात.

गौराईला महानैवेद्य दाखवितात. तिच्यासाठी खास गोडाधोडाचं जेवण केले जाते. यामध्ये 16 भाज्या, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. नेहमीप्रमाणे महालक्ष्मीची पूजा करून चांगला नैवेद्य दाखवून तो आपण प्रसाद म्हणून घ्यायचा असतो. महालक्ष्मीला खास आंबील आणि कथलीचा नैवेद्य दाखवीला जातो.

कोकणात अनेक ठिकाणी गौराईला तिखटाचा नैवेद्य म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. यावेळी गौराईसाठी कोंबडी-वडे असा नैवेद्य केला जातो. गौराई पूजनानंतर 5 सप्टेंबरला मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT