Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

'या' 6 गोष्टींची नियमितपणे पुजा केल्यास जीवनात येईल सुख-शांती

शास्त्र आणि पुराणात काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता.

Puja Bonkile

प्रत्येकाला आनंदी आयुष्य जगण्याची इच्छा असते. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे जीवन आनंदाने भरलेले असावे. पैशाची आणि धान्याची कधीही कमतरता जाणवू नये. यासाठी लोक खुप मेहनत करतात. 

परंतु, काहीवेळा खुप मेहनत करून देखील नशीब लोकांना साथ देत नाही. त्यांना नेहमीच अपयश आणि निराशेचा सामना करावा लागतो. तुम्हालाही सतत अपयश येत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. शास्त्र आणि पुराणात काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. 

जीवन यशस्वी करण्यासाठी गरुड पुराणातही अनेक उपाय सांगितलेले आहेत. याशिवाय गरुड पुराणात अशा काही गोष्टींच्या पूजेचा उल्लेख आहे, ज्या केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी लाभते.

  • भगवान विष्णू 

गरुड पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीने आपल्या दिवसाची सुरुवात भगवान विष्णूची पुजा करून केली तर त्याला त्याच्या कामात नक्कीच यश मिळते. भगवान विष्णूची रोज मनोभावे पूजा करावी. असे मानले जाते की भगवान विष्णू आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात आणि त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धी लाभते.

  • एकादशी व्रत 

गरुड पुराणा व्यतिरिक्त अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये एकादशी व्रताचे महत्व सांगितलेले आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळतो त्याला नेहमीच शुभ फळ मिळते. त्यामुळे जीवनात सुख-समृद्धी हवी असेल तर सर्वांनी एकादशीचे व्रत पाळावे.

  • तुळस 

तुळशीचा संबंध थेट भगवान विष्णूशी आहे. तुळशीला विष्णू प्रिया असेही म्हणतात. गरुड पुराणानुसार तुळशीची नियमित पूजा केल्याने जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. तसेच नियमितपणे तुळशीखाली दिवा लावणे शुभ मानले जाते.

  • गंगा नदी

हिंदु धर्मात गंगा नदीला खुप महत्व आहे. गरुड पुराणातही गंगेचे पाणी सर्व पापांपासून मुक्ती देणारे आहे असे मानले जाते. गंगा मातेची नियमितपणे पूजा करावी. तसेच कोणत्याही देव किंवा देवीला पाणी देताना पाण्यात थोडेसे गंगाजल मिक्स करावे.  

  • ज्ञानी लोकांचा आदर

गरुड पुराणात म्हटले आहे की, ज्ञानी लोकांचा नेहमी आदर केला पाहिजे. जे लोक ज्ञानी लोकांचा आदर करतात ते जीवनात नेहमीच यशस्वी होतात. 

  • गाय

हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले जाते. असे मानले जाते की गायीच्या शरीरात सर्व देवी-देवता वास करतात. यामुळे जो कोणी गायीला देवता मानून तिची पूजा करतो त्याचे सर्व त्रास संपतात आणि त्याला पापांपासून मुक्तीही मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

Viral Video: नवी कोरी थार काही दिवसांत बंद पडली; मालकाने गाढवं बांधून, ताशा वाजवत कार शोरुमला ओढत नेली, व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

SCROLL FOR NEXT