भारतात गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. गणेश चतुर्थी ही शुक्ल पक्ष भाद्रपदमध्ये साजरी केली जातो. विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी भाविक गणपती बाप्पाच्या मंदिरात जातात. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराप्रमाणेच भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. चला तर मग जाणून घेवूया भारतातील प्रसिद्ध गणपती बाप्पाचे मंदिरे.
* सिद्धिविनायक मंदिर (मुंबई)
सिद्धिविनायक मंदिर हे देशातील सर्वात प्रसिद्ध मंदिर महणून ओळखले जाते. हे मंदिर मुंबईच्या प्रभादेवी भागात वसलेले आहे. सिद्धिविनायकाला "इच्छा पूर्ण करणारा स्वामी" म्हंटले जाते. सिद्धिविनायकाची मूर्ती इतर गणेशमूर्तीपेक्षा वेगळी आहे. सिद्धिविनायक बाप्पाच्या एका हातात कमळ, एक जपमाला, मोदक आणि कुऱ्हाड आहे तर देवी रिद्धि आणि सिद्धी दोन्ही बाजूंनी बसलेल्या दिसतात.
* श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर (पुणे)
गणपती बाप्पाचे हे मंदिर पुण्यात वसलेले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दगुशेठ हलवाई यांनी बांधलेले आहे. जे व्यवसायाने हलवाई होते. हे मंदिर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रसिद्ध मंदिर आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट भारतातील सर्वात श्रीमंतापैकी एक आहे.
* गणेश टोक (सिक्कीम)
हे मंदिर समुद्रसपाटीपासून 6500 मिटरपेक्षा अधिक उंचावर वसलेले आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोकमधील हे एक प्रतिष्ठित मंदिर आहे.
* गणपतीपुळे (रत्नागिरी)
हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध देवस्थानापैकी एक आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नाइरसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे मंदिर आगळेवेगळे आहे. तसेच गणपतीपुळे पर्यटनाचे ठिकाणं म्हणून प्रसिद्ध असल्याने दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात.
* मोती डुंगरी (जयपूर)
जयपूरमधील मोती डुंगरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे मंदिर चारशे वर्षाहून अधिक जून आहे. येथे डाव्या बाजूस सोंड असलेली गणेशमूर्ती आहे. हे मंदिर राजस्थानमधील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक आहे.
* त्रिनेत्र गणेश मंदिर (राजस्थान)
त्रिनेत्र गणेश मंदिर राजस्थानमध्ये रणथंबोर किल्ल्यावर वसलेले आहे. हे मंदिर 1000 वर्ष जून आहे. हे मंदिर निसर्ग आणि श्रद्धचे अनोखे मिश्रण आहे. या मंदिरात गणपती बाप्पा त्रिनेत्राच्या स्वरूपात विराजमान आहे. यात तिसरा डोळा ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. संपूर्ण जगातील हे एकमेव मंदिर आहे जिथे गणपती बाप्पा आपल्या संपूर्ण कुटुंबासह विराजमान आहेत.
* पार्वतीनंदन गणपती मंदिर (पुणे)
हे गणपती मंदिर चर्तुश्रृंगी येथील गणेश खिंडमध्ये असून, 17 व्या शतकातील हे मंदिर तुमचे लक्ष नक्कीच वेधून घेईल. नोव्हेंबर 2012 ते ऑगस्ट 2013 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. परिणाम-सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी 2015 च्या युनेस्को एशिया-पॅसिफिक पुरस्कारांमध्ये त्याला 'सन्माननीय उल्लेख' सह मान्यता मिळाली आहे. जीर्णोद्धाराचे काम शहर आधारित फर्म बेहेन्स, रोहन बिल्डर्स आणि मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी चंद्रशेखर बाभळे यांनी संयुक्तपणे केले. चाफेकर बंधूंनी रँडला मारल्यानंतर ते याच मंदिराच्या कळसावर लपून बसले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.