Ganesh Chaturthi 2021: Here's the list of sweet delicacies for beloved Bappa Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganpati Chaturthi 2021: आपल्या लाडक्या बाप्पासाठी श्रीखंड, बासुंदी अन् मोदकाचा प्रसाद...

10 दिवसांत बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ प्रसाद म्हणून देण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो.

दैनिक गोमन्तक

गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. आपल्या लाडक्या बाप्पांला मोठ्या भक्ती भावात घरी आणण्यासाठी सर्व जण आतूर झाले असून, बाप्पांच्या सजावटी, प्रसादाचे पदार्थ याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. या 10 दिवसांत बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ प्रसाद म्हणून देण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. यंदा असे वेगवेगळे पदार्थ बाजारात आले आहेत. चला तर मग जाणून घेवूया बाप्पांच्या 10 दिवसांच्या दहा वेगवेगळ्या स्वादिष्ट प्रसादाबद्दल...

1) जेव्हा आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवायचा असेल तर सर्वात आधी नाव येते मोदकाचे. कारण मोदक हा बाप्पाचा आवडता पदार्थ आहे. यामुळे गणेश चतुर्थीला मोदक अर्पण करावे.
2) दुसऱ्या दिवशी बाप्पाला मोतीचूरचे लाडू अर्पण करावे. बाप्पाला लाडू सुद्धा खूप प्रिय आहे.
3) घरी बनवलेले बेसनचे लाडू सुद्धा बाप्पाला अर्पण करता येतात. प्रसाद म्हणून घरी बनवलेले बेसनचे लाडू घरात सर्वांना आवडतील.
4) आरतीच्या चौथ्या दिवशी फळांचा प्रसाद दाखवावा. केळ हे फळ अर्पण करावे. कारण आपल्या सनातन धर्मात केळाला महत्व प्राप्त झाले आहे.
5) आपल्या लाडक्या बाप्पाला घरी बनवलेली मखानाची खीर अर्पण करू शकता.
6) सहाव्या दिवशी बाप्पाला नारळ प्रसाद म्हणून अर्पण करावे. यामुळे बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील.
7) घरी बनवलेलल्या प्रसादाला वेगळीच चव असते. कारण आपण प्रसाद पूर्ण श्रद्धेने बनवत असतो. तुम्ही ड्रायफ्रुट्सचे लाडू प्रसाद म्हणून अर्पण करू शकता.
8) दूधपासून बनवलेला कलाकंद बाप्पाला प्रिय आहे. या 10 दिवसापैकी कोणत्याही एका दिवशी बाप्पाला तुम्ही कलाकंदचा प्रसाद अर्पण करू शकता.
9)बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी केसरपासून बनवलेले श्रीखंड सुद्धा अर्पण करू शकता.
10) शेवटच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी बनवलेले विवध प्रकारचे मोदक अर्पण करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT