कोरगावचा 57 वर्षांचा सार्वजनिक गणपती Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Chaturthi 2021: कोरगावचा 57 वर्षांचा सार्वजनिक गणपती

गेली 57 वर्षे कोरगांव गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.

दैनिक गोमन्तक

गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन गणेशोत्सव करावा जेणेकरून आपापसातील हेवेदावे व मतभेद विसरून ते या उत्सवात सामील होतील हा हेतू ठेवून कोरगांवचे सुपुत्र, माजी आमदार कै. विजय मारुती कामुलकर यांनी हा उत्सव 1964 साली कोरगांव येथे सुरू केला. तेव्हापासून ते आजपर्यंत गेली 57 वर्षे कोरगांव गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.

माजी आमदार विजय मारुती कामुलकर यांनी गावातील काही नागरिकांसमोर गावात सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन करावा असा विचार मांडला आणि त्याला मूर्त स्वरूप येऊन श्रद्धेच्या भावनेने गणेश मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. लोकमान्य बालगंगाधर टिळक यांच्यापासून प्रेरणा घेऊनच त्याकाळी हे पाऊल उचलले गेले होते.

सार्वजनिक मंडळाचा पहिला गणपती श्री कमलेश्वर मंदिरासमोरच्या इमारतीत पूजला गेला. त्यावेळी सार्वजनिक गणपती पूजन करण्याची प्रथा गोव्यात फार नव्हती. पेडणे तालुक्यात तर अजिबात नव्हती. राज्यात दोन ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव त्या काळात होते. कोरगाव येथे तालुक्यातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असल्याने नागरिकांना कुतूहल लागून गेले होते. त्याकाळात लोकांची आर्थिक स्थितीही फार बरी नव्हती. तरीही लोकांनी हा उत्सव उत्साहाने साजरा केला. तालुक्यात पहिलाच गणपती साजरा होत असल्याने तो कामुलकरांचा गणपती असा ओळखला जायचा. त्यानंतर गावातील आणि गावाबाहेरील नागरिक या उत्सवात सहभागी झाले. श्रद्धेने आर्थिक मदत येऊ लागली. उत्सवाचे स्वरूप वाढत गेले .

कोरगांवातील नागरिक हे सर्व कलागुणांमघ्ये अग्रस्थानी आहेत आणि या सर्व कलाकारांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळून देण्यास सार्वजनिक गणेशोत्सव कोरगाव मंडळाचा मोलाचा वाटा आहे. हितचिंतकांच्या सहकार्याने मंडळ अनेक उपक्रम राबविते. कोरोनाकाळापूर्वी चतुर्थीच्या 11 दिवसात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे. शालेय मुलांच्या स्पर्धा, भजनी स्पर्धा, फुगडी स्पर्धा, नाटके इत्यादी कार्यक्रम उमेदीने होत असत आणि शेवटच्या दिवशी गावातील महिला, पुरुष, युवक एकत्रितपणे महाप्रसाद बनवित असत. त्यानंतर मोठ्या उत्साहाने श्रींचे विसर्जन होत असे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT