Don't Eat lemon with these Fruits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Don't Eat lemon with these Fruits: 'या' फळामध्ये लिंबू अन् मीठ टाकून खातायं? आरोग्यावर होऊ शकतो विपरित परिणाम

निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात भाज्या आणि फळे खाणे फायदेशीर असते. पण या गोष्टी देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Don't Eat lemon with these Fruits: निरोगी राहण्यासाठी आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करणे गरजेचे आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या जेवणात जास्तीत जास्त फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. वेगवेगळ्या रंगांची फळं आणि भाज्यांमध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात.

फळं आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. पण तुम्हाला माहित आहे का असे अनेक पदार्थ आहेत ज्यांच्यासोबत फळं खाणे टाळले पाहिजे. जसे की आंबट फळं दुधासोबत खाऊ नयेत. कारण यामुळे पचनसंस्थेशी संबंधित आजार उद्भवू शकतात. 

जास्त फळे आणि भाज्या पोटात अनेक समस्या निर्माण करू शकतात. अशीच काही फळे आहेत ज्यासोबत लिंबू खाऊ नये. ते आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. म्हणूनच लिंबासोबत काही फळे खाण्यास मनाई आहे. चला जाणून घेऊया लिंबासोबत कोणती फळे खाणे टाळावे. 

  • लिंबासोबत पपई खाऊ नका

पपईमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. पपई खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी तेसच वजन कमी करण्यासाठी अनेक लोक पपई खातात.

दुसरीकडे, लिंबू आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. पण दोन्ही एकत्र खाणे आरोग्यासाठी फारसे चांगले नाही आणि ते तुमच्या पोटात आम्ल बनवू शकते. 

  • लिंबू आणि पपई एकत्र खाणे टाळावे

लिंबू (Lemon) आणि पपई या दोन्हीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. पण हे दोन्ही एकत्र खाल्ले तर त्याचे विषात रुपांतर होते. तसेच यात मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे यांचा समावेश होतो. दुसरीकडे, हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने अॅनिमिया आणि हिमोग्लोबिन असंतुलनाची समस्या सुरू होते. 

Papaya Side Effects
  • पपई खाल्यानंतर लगेच लिंबू खाणे टाळावे

अनेकदा लोक पपईवर मीठ आणि लिंबू टाकून खातात. पण असे करु नका. हे दोन पदार्थ खाण्यांमध्ये विशिष्ट वेळेचे अंतर ठेवावे. पपई खाल्ल्यानंतर एक तासानंतरच लिंबू खा. 

  • चुकून लिंबू बरोबर पपई खाल्ली तर काय करावे

जर तुम्ही लिंबू सोबत पपई खाल्ली असेल तर तासाभर काही तरी अॅक्टिव्हिटी करत रहा. यामुळे तुमच्या शरीरात विष निर्माण होणार नाही .

चुकूनही या गोष्टी आंब्यासोबत खाऊ नका

1. कारला

लोकांना उन्हाळ्यात कारला खायला आवडतो. जेव्हा लोक कारल्याची करी खाताना आंबे खाऊ लागतात तेव्हा काळजी वाढते. तुम्हीही असेच करत असाल तर आजपासूनच हे करणे बंद करा, कारण आंब्यासोबत कारले खाल्ल्याने मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.

2. मसालेदार अन्न

जर तुम्ही कोणतेही मसालेदार पदार्थ खात असाल तर चुकूनही आंब्याला हात लावू नका. कारण असे केल्याने पोट खराब होउ शकते.

Mango

3. पिण्याचे पाणी

अनेक लोक जेवण करतांना पाणी पिणे टाळतात. तसेच आंबा हे फळ खाल्यावर देखील पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.  कारण असे केल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो.

4. दही

लोकांना जेवताना अनेकदा दही खायला आवडते आणि दह्याबरोबरच त्यांना आंब्याची मजाही येऊ लागते. तुम्हीही दह्यासोबत आंबा खात असाल तर पुन्हा अशी चूक करू नका. कारण असे केल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

5. कोल्ड ड्रिंक

आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक पिऊ टाळावे. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी तर वाढतेच पण तुमच्या पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.


(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT