Summer In Goa:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer In Goa: उन्हाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी फळे ठरतात अमृतासमान

Summer In Goa: जास्तीत जास्त फळे आणि भाज्यांचा समावेश आहरात करणे ही उन्हाळ्यात तंदुरुस्त राहण्याची गुरुकिल्ली असते.

Shreya Dewalkar

Summer In Goa:

जास्तीत जास्त फळे आणि भाज्यांचा समावेश आहरात करणे ही उन्हाळ्यात तंदुरुस्त राहण्याची गुरुकिल्ली असते. त्यातील पोषक तत्वे शरीराला या दिवसात महत्वाची साथ देतात. पालेभाज्यांमध्ये असलेली तत्वे शरीराला थंड राखण्यात मदत करतात.

या दिवसात बाजारात आलेल्या स्थानिक फळांचे सेवन करणे हे महत्वाचे असते. अशा फळांमध्ये शरीराची उष्णता कमी करणारे गुणधर्म असतात. कलिंगडे या दिवसात बाजारात राशीने मांडलेली दिसतील. त्यांच्याकडे नुसते पाहिले तरी थंडगार वाटते.

पाण्याचे सर्वात जास्त प्रमााण असणारे हे फळ आहे. ते खाल्ल्याने नुसती भूक आणि तहान भागते इतकेच नव्हे तर मनही तृप्त होऊन जाते. त्यात कॅलरीचे प्रमाणही अगदी कमी असते त्यामुळे ते भरपूर खाल्ले तरी वजन वाढण्याची भिती नसते. त्यात असलेल्या व्हिटॅमीन ए आणि सी मुळे शरीराला पोषक उर्जाही लाभते. त्यातील फयबरमुळे शरीरातील पचनसंस्था सुधारण्यासही मदत मिळते.

उन्हातून फिरुन आल्यानंतर एक ग्लास थंड लिंबाचा रस जो आनंद देतो त्याची तुलना होऊ शकत नाही. लिंबू हा व्हिटॅमीन सी, कॅल्शियम, फोलेट, पोटॅशियम यासारख्या पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. उन्हाळ्यात उकाड्यामुळे शरीरातील उर्जा कमी झाल्यासारखी वाटते. अशावेळी लिंबू पाणी हा त्यावरचा हमखास उपाय ठरू शकतो.

अपचन या उन्हाळी समस्येवर तर लिंबूपाणी हे उताऱ्यासारखे काम करते. त्याशिवाय, उन्हाळ्यात आपली त्वचा ओलावा गमावत असते. अशावेळी त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ते उपाय ठरते. टोमॅटो हा देखील उन्हाळ्यात अपल्या आहाराचा भाग असला पाहिजे. उन्हाळ्यात डिहायड्रेशन होते ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू शकते.

टाेमॅटोमध्ये 94 टक्के पाणी असते जे त्वचेला चांगला ओलावा देऊ शकते तसेच ते त्वचेला चमकदार बनवते. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पोटाच्या जळजळीवर टोमॅटो उपायकारक असतो.

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात दही-भाताचा अंतर्भाव करणे चांगले. पचनासाठी दहीभात फार चांगला असतो. उन्हाळ्यात अनेकदा खाण्याची इच्छा होत नाही, भूक लागत नाही अशावेळी दहीभात हा चांगला पर्याय ठरू शकतो. दह्यामुळे पोट आणि मस्तक दोन्हीही शांत राहते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT