Friday Laxmi Puja Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Friday Laxmi Puja: तुम्हाला माहीत आहे का धनदेवतेचा आशीर्वाद कोणाला मिळतो?

नीतीमार्गाचा अवलंब करून पुण्य कर्म करणार्‍या गृहस्थाच्या घरी लक्ष्मी वास करते

दैनिक गोमन्तक

Laxmi Puja: लक्ष्मीला धनाची देवी मानली जाते. कलियुगात धनाचा विशेष महिमा सांगितला आहे. यामुळेच कलियुगात लक्ष्मीचे विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी माता धनासोबतच सुख, समृद्धी आणि संपत्तीशी संबंधित आहे. यामुळेच लक्ष्मीजींचा आशीर्वाद प्रत्येकाला मिळावा असे वाटते, पण लक्ष्मीचा आशीर्वाद सर्वांनाच मिळत नाही.

लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कोणाला मिळतो?

लक्ष्मीचा आशीर्वाद कोणाला मिळतो याचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा श्लोक समजून घ्यावा लागेल-

स्थिती पुण्यवतं गेहे सुनितिपथवेदिनम् ।

गृहस्थान नृपणम् या पुत्रवत्पलयामि तन ।

म्हणजे नीतीमार्गाचा अवलंब करून पुण्य कर्म करणार्‍या गृहस्थाच्या घरी मी राहते आणि पुत्राप्रमाणे अनुसरतो. म्हणजे चांगले कर्म करणाऱ्या आणि प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्यांच्या घरी लक्ष्मी वास करते.

लक्ष्मी माता कुणाला आशिर्वाद देते

शास्त्रांमध्ये लक्ष्मी मातेच्या काही स्थानांचा उल्लेख करण्यात आला आहे, जे या गोष्टींची काळजी घेतात, त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते-

मधूर वाणी असलेल्या, आपल्या कृतीत गंभीर असलेल्या आणि जे आजारापासून दूर राहतात आपल्या आरोग्याची स्वच्छतेची काळजी घेतात, अशा लोकांच्या घरात लक्ष्मी वास करते.

जे धर्मावर विश्वास ठेवतात, जे सर्वांवर प्रेम करतात आणि आई-वडिलांची सेवा करतात त्यांना लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो.

जिथे अन्नाचा आदर केला जातो, जिथे पशू-पक्षी राहतात, जिथे गृहीणीचा आदर होत असेल आणि घरात कलह नसतो, ते घर लक्ष्मी कधीही सोडत नाही.

जे खोटे बोलत नाहीत, स्वार्थी नसतात आणि अहंकारापासून दूर राहतात, इतरांचा आदर करतात, मानव कल्याणासाठी योगदान देतात, अशा लोकांना लक्ष्मी माता आपला आशीर्वाद देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "डॉक्टर, मुझे टेस्ट कराना होगा...", IPL 2027 मध्ये धोनी खेळणार की नाही? माहीने स्वतःच दिले मोठे संकेत, पाहा व्हिडिओ

Goa Development Architects: गोव्याचा विकास पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध हवा! CM सावंत यांनी अधोरेखित केले वास्तुविशारदांचे महत्त्व

Government Employees Salary: गोवा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी संधी! वेतन निश्चितीचा पर्याय निवडण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदत

Rafale Marine Flight Tests: गोव्यात 'राफेल मरिन'ची पुन्हा चाचणी! 'आयएनएस विक्रांत'वर तैनातीपूर्वी महत्त्वाचे परीक्षण

पहाटेच्या खनिज वाहतुकीला ग्रामस्थांचा ब्रेक! पिळगावात 'वेदांता'चे ट्रक अडवले; 2 तासांनी वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT