Prostate Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Prostate Cancer: वारंवार लघवी होणे असू शकते प्रोस्टेट कर्करोगाचे लक्षण, 'ही' चाचणी करा अन् वेळीच सावध व्हा!

Painful Urination Causes: साधारणपणे वाढत्या वयानुसार प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो, ज्यामुळे लघवी करताना समस्या येते. वारंवार लघवी लागणे हे केवळ प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे होत नाही. ही प्रोस्टेट कर्करोगाची (Cancer) सुरुवातीची लक्षणे देखील असू शकतात.

Manish Jadhav

प्रोस्टेट म्हणजे पौरुष ग्रंथी. अनेकदा लोक या ग्रंथीबद्दल निष्काळजी राहतात. साधारणपणे या ग्रंथीमध्ये कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता वाढत्या वयानुसारच असते. पण जर तुम्हाला सारखी-सारखी लघवी लागत असेल तर काळजी घ्या. कारण वारंवार लघवी लागणे हे प्रोस्टेटशी संबंधित गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते. याशिवाय, लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे हे प्रोस्टेट ग्रंथीशी संबंधित समस्यांमुळे देखील असू शकते. चला तर मग यामुळे कोणते गंभीर प्रोस्टेट रोग होऊ शकतात हे तज्ञांकडून जाणून घेऊया...

दरम्यान, साधारणपणे वाढत्या वयानुसार प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो, ज्यामुळे लघवी करताना समस्या येते. वारंवार लघवी लागणे हे केवळ प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे होत नाही. ही प्रोस्टेट कर्करोगाची (Cancer) सुरुवातीची लक्षणे देखील असू शकतात. याशिवाय, जळजळ होणे, लघवी करताना वेदना होणे किंवा लघवीसोबत रक्त येणे ही देखील त्याची लक्षणे असू शकतात. म्हणून, सुरुवातीची लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधावा. वेळेवर उपचार घेतल्यास प्राण वाचू शकतात.

इतर लक्षणे

प्रोस्टेट कर्करोगाच्या सुरुवातीला लघवीच्या नमुन्यात बदल होणे हे एक सामान्य लक्षण आहे. मात्र काही लोक याला अजिबात लक्षण मानत नाहीत. याशिवाय, रात्री वारंवार लघवी लागणे, लघवी करताना अचानक लघवी थांबणे, लघवी करताना जळजळ आणि तीव्र वेदना जाणवणे, लघवीवरील नियंत्रण सुटणे, यासोबतच लघवी किंवा वीर्यातून रक्त येणे ही प्रोस्टेट कर्करोगाचे लक्षणे आहेत. वीर्य स्खलनाच्या वेळी वेदना आणि कंबरेमध्ये वेदना ही देखील त्याची लक्षणे आहेत.

उपचार शक्य आहेत

प्रोस्टेट कर्करोगावर उपचार शक्य आहेत. सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यावर जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि स्वतःची तपासणी करुन उपचार सुरु केले तर त्यावर उपचार शक्य आहेत. प्रोस्टेट कर्करोगाची तपासणी करण्यासाठी डॉक्टर तुमची डिजिटल रेक्टल टेस्ट आणि प्रोस्टेट एंटिजन टेस्ट (PSA) करु शकतात. प्रोस्टेट ग्रंथी काढून टाकून डॉक्टर तुम्हाला या गंभीर आजारातून बरे करु शकतात, मात्र त्यासाठी वेळीच लक्षणे ओळखून डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'हा तर गोव्याच्या परंपरेचा अपमान...!' रूद्रेश्वर मंदिरात वाढदिवस साजरा करणं दामूंना पडलं महागात, विरोधक आक्रमक

Devarai: ..काही कोटी वर्षांपूर्वीचे, भारतात चारच ठिकाणी असणारे वृक्ष; गोव्यातील देवराया आणि त्यांचे महत्व

प्रेषित मुहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, गोव्यात मुस्लिम समाज आक्रमक; कारवाई करण्याची मागणी

Kshatriya Migration: काठियावाडी क्षत्रिय समुद्रमार्गे आले, ते झुआरी नदीकाठी किनाऱ्यावरच्या खेड्यांत वसले; स्थलांतरणाचा इतिहास

Goa Slums: सामान्य गोवेकर घर घेण्यासाठी राबतोय, अतिक्रमण करणाऱ्यांना मात्र ‘अभय’ मिळतंय; झोपडपट्ट्यांचे कुरूप राजकारण

SCROLL FOR NEXT