Footwear for Monsoon Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Footwear for Monsoon: पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे शूज वापरावे

पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे शूज घालावेत हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Footwear for Monsoon: पावसाळा सुरू झाला असून उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात सगळीकडे पाणीच असते. पण पावसामुळे आपली काम आपण थांबवू शकत नाही.

कामानिमित्त आपल्याला घरा बाहेर जावेच लागते. अशावेळी पावसाळ्यात आपले महागडे शूज पाण्याने खराब होण्याची समस्या अनेकांना असते. चला तर मग जाणून घेऊया पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे शूज घालावेत.

  • वॉटरप्रूफ शूज

पावसाळ्यात काही ठिकाणी भरपूर पाणी असेल तर अशा ठिकाणी वॉटरप्रूफ बूट वापरावे. वॉटरप्रूफ बूट्सची लांबी चांगली असते, त्यामुळे जिथे भरपूर पाणी असते तिथेही तुम्ही ते घालू शकता आणि आरामात फिरू शकता. वॉटरप्रूफ असल्याने त्यांच्यात पाणी जात नाही. पावसाळ्यात असे बूट उपलब्ध असतात.

  • स्किमर शूज

स्किमर शूज हलके आणि लवचिक असतात. रबर आणि चामड्याचे बनलेले हे शूज पावसाळ्यात घसरत नाही.

  • पीव्हीसी लोफर्स

पावसाळ्यात स्टायलिश दिसण्यासह सुरक्षित शूज अनेक ब्रँड लाँच करतात. या शूजचे साहित्य पीव्हीसीचे बनलेले आहे, त्यामुळे ते पावसाळ्यासाठी पूर्णपणे योग्य आहेत. लोफर्समध्ये स्लिप-ऑन क्लोजर असते जे स्टाईलमध्येही खूप आरामदायक असते.

पावसाळ्यात ओले शूज सुकवण्यासाठी काय करावे

  • पंखाखाली कोरडे करा

पावसाळ्यात बरेच दिवस सूर्यप्रकाश नसतो तेव्हा ओले शूज सुकवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पंखे.

सर्व प्रथम, तुम्ही लेसेस काढा आणि इनसोल काढा आणि शूजसह पंखाखाली ठेवावे. जर तुम्हाला अधिक लवकर कोरडे करायचे असेल तर या गोष्टी टेबल फॅनसमोर ठेवा आणि पंखा चालू करून फुल स्पीडवर ठेऊ शकता.

  • कागदाची मदत घ्या

ओले शूज टिश्यू पेपर किंवा जुन्या वर्तमानपत्रांच्या मदतीने सुकवता येतात. सर्वात पहिले हा कागद शूजमध्ये भरून घ्यावे.यामुळे पाणी शोषले जाईल.

ही पद्धत पुन्हा पुन्हा करावी. ही एक अतिशय प्रभावी पद्धत आहे. जेव्हा ओलावा जवळजवळ निघून जातो, तेव्हा सामान्य खोलीच्या तापमानातही ते सहज कोरडे होईल.

  • हेअर ड्रायर वापरा

​​हेअर ड्रायरचे मुख्य कार्य म्हणजे ओले केस सुकवणे आहे. पण त्याच्या मदतीने तुम्ही ओले शूज देखील सुकवू शकता. शूजच्या आतील बाजूने तसेच बाहेरील बाजूने ड्रायर फिरवावे. यामुळे शूज सुकेल.

  • कॉटनचा नॅपकिन वापरावा

पावसाळ्यात शूज सुकवणे कठिण असते. पण तुम्ही कॉटनच्या नॅपकिनचा वापर करून ओले शूज सुकवू शकता. यासाठी शूजमधील पाणी काढून टाकावे. नंतर शूजमध्ये कॉटनच्या नॅपकिन ठेवावा. यामुळे राहिलेले पाणी शाषुन घेणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

SCROLL FOR NEXT