Travel Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tips For Travelling: प्रवास सुखकर होण्यासाठी 'या' गोष्टींची काळजी घ्या

Tips For Travelling: प्रवासात लिंबू, संत्री, गोड लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे सोबत ठेवा.

दैनिक गोमन्तक

Tips For Travelling: पावसाळ्याचा ऋतुला सुरुवात झाली की बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन सुरु होतात. मात्र अनेकांना प्रवासात आजारपण येते किंवा प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास सुरु होतो.

त्यामुळे ज्यांना असा प्रवासाचा त्रास होतो त्यांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे. आज आपण प्रवासादरम्यान कोणती काळजी घ्यावी हे पाहणार आहोत.

1.जर तुम्हाला गॅस आणि अॅसिडिटीची समस्या असेल तर प्रवासादरम्यान आवश्यक औषधे सोबत ठेवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने खा.

2. लांबच्या प्रवासाआधी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, जर तुम्ही आधीपासूनच आजारी असाल तर प्रवास टाळला पाहिजे.

3. जेव्हाही तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागते तेव्हा या दिवशी चहा आणि कॉफीपासून दूर राहा कारण यामुळे पोटात गॅस निर्माण होतो ज्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते.

4. प्रवासाला निघण्यापूर्वी काहीतरी खाणे गरजेचे आहे सहज पचतील अशा गोष्टी खा.

5. प्रवासात अनेकदा उलट्या होत असल्यास वेलची तोंडात ठेवा, मळमळ होण्याची तक्रार दूर होईल.

6. प्रवासाला निघाल्याच्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा ओवा आणि काळे मीठ प्या, गॅसची समस्या उद्भवणार नाही.

7. प्रवासात सकाळी रिकाम्या पोटी कोमट दूध पिणे टाळा.

8. वाटेत शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका, पाणी किंवा फळांचा ज्युस सोबत ठेवा.

9. प्रवासात लिंबू, संत्री, गोड लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे ठेवा आणि प्रवासादरम्यान ही फळे खात राहा.

10. अर्धा ग्लास पाण्यात एक चमचा सफरचंद व्हिनेगर मिसळा आणि सकाळी प्या, यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

11. प्रवासादरम्यान तुमच्यासोबतच तुमच्या वाहनांचीदेखील काळजी घ्या.

अशा प्रकारे प्रवासाला निघण्यापूर्वी स्वत:ची काळजी घेतली तर तुमचा प्रवास चांगला होऊ शकतो आणि आपला प्रवास सुखकर करु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT