प्रत्येक स्त्रियांकडे ग्लॉसी (Glossy) आणि मॅट (Matt) नेल पॉलिश या दोन प्रकारचे नेल पॉलिश (Nail polish) असतात. कधी कधी आपल्याला नेल पेंटचा रंग (color) खूप आवडतो . परंतु ते नेल पेंट ग्लॉसी असते . अशावेळी तुम्हाला जर मॅट लुक (Matt Look) हवा असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.
* सर्वात पहिले, भांड्यात गरम पाणी ठेवण्यासाठी ठेवावे. तोपर्यंत तुमच्या बोटांना नेलल पेंट लावून घ्यावे. नंतर त्या नखांना स्टीम करावे. काही वेळा नंतर ग्लॉसी नेलपेंट मॅट नेल पेंट रूपांतर होईल. आता जाणून घेवूया नेल पॉलिशला मॅट फिनिश देण्याच्या टिप्स
* आयशॅडोच्या मदतीने तुम्ही मॅट नेल पेंटही लावू शकता. जर तुमच्या आयशॅडोची मुदत संपली असेल तर ती बारीक करून घ्या. नंतर त्यात थोडी टेलकम पावडर घाला. यानंतर, त्यात थोडा बेस नेल पेंट कोट घाला आणि चांगले मिक्स करा. तयार आहे तुमचा मॅट नेल पेंट.
* आता टेलकम पावडरपासून नेल पेंट बनवण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये तुमच्या आवडीनुसार नेल पेंट काढावा. त्यानंतर त्यात टेलकम पावडर घालावी. नंतर त्यात नेल पेंट घालावी. आता हे मिश्रण तुम्ही नेल पेंटमध्ये मिक्स करताच कोरडे होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.