Women Health Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Women Health Tips: मासिक पाळीपुर्वी होणाऱ्या त्रासावर 4 घरगुती उपाय

Premenstrual Care Tips: मासिक पाळी येण्यापूर्वी महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

दैनिक गोमन्तक

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर अनेक महिलांना काहीच त्रास होत नाही. हे सर्व हार्मोन्सवर अवलंबून असते. बर्‍याच स्त्रिया मासिक पाळीपूर्वी (Menstrual) एक आठवडा आधी काळजी करू लागतात. प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (PMS) या लक्षणांमध्ये पोट फुगणे, पाणी टिकून राहणे, डोकेदुखी, , चिडचिड, खाण्याची इच्छा होणे, पोट खराब होणे, बद्धकोष्ठता, पुरळ, किंवा थकवा येणे यांचा समावेश असू शकतो. PMS वर कोणताही खरा इलाज नसला तरी घरगुती उपायांनी तुम्ही हा त्रास कमी करू शकता. (Women Premenstrual Care Tips News)

बडीशेप पाणी-

बडीशेप महिलांच्या हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते. पीएमएस दरम्यान महिलांना अस्वस्थतेपासून आराम मिळतो. त्याच्या मदतीने पीएमएसमध्ये आराम मिळवण्यासाठी, एक चमचा चुरलेली बडीशेप एक कप उकळत्या पाण्यात मिसळा. 10 ते 15 मिनिटे पाण्यात राहू द्या. हा बडीशेप चहा रोज गाळून प्या. तुम्हाला लगेच आराम मिळेल.

दालचिनी चहा-

दालचिनी एॅटी-इंफ्लेमेटरी आणि अँटिस्पास्मोडिक गुणधर्मांनी समृद्ध असते. यामुळे अनेक समस्या दुर करण्यास मदत करते. या मसाल्यामध्ये कॅल्शियम, मॅंगनीज आणि लोह देखील असते. ते पचन आणि रक्तातील साखर नियंत्रणासाठी देखील चांगले असते. यासाठी एक कप उकळत्या पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर मिसळा, थोडे दूध आणि थोडा मध घाला. काही मिनिटे उकळू द्या. मग मासिक पाळीपूर्वी किमान एक आठवडा दररोज हा चहाचे सेवन करा.

फ्लॅक्ससीड्स-

पीएमएसच्या लक्षणांपासून मुक्त मिळवण्यासाठी तुम्ही फ्लेक्ससीड्स खाऊ शकता. दिवसातून दोनदा आपल्या नित्यक्रमात याचा समावेश करा. दररोज एक चमचा ताजे ग्राउंड फ्लेक्ससीडचे सेवन करावे. त्यात ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात जे PMS लक्षणे कमी करण्यास फायदेशिर ठरतात.

कोथिंबिरीचे पाणी-

पीएमएसच्या लक्षणांपासून मुक्त होण्यासाठी दिवसातून एकदा तरी कोथिंबिरीचे पाणी प्यावे. कोथिंबीर तुमच्या आतड्याला शांत करते ज्यामध्ये हार्मोन्स तयार होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT