Heart Health Tips: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयाचे आजार होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ताणतणाव, मद्यपान आणि धूम्रपान यासारख्या वाईट सवयींमुळे रक्तदाबाची समस्या वाढू शकते.
तुम्हाला हृदय निरोगी ठेवायचे असेल तर या सवयी सोडण्यासोबतच तुम्हाला व्यायाम आणि आहाराकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल. योग्य आहाराद्वारे तुम्ही हृदयविकारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकता.
अंबाडीच्या बिया Flax seeds
अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, अला लिनोलेनिक ॲसिड आढळतात. हृदयाच्या आरोग्यासाठी हे घटक फायदेशीर मानले जातात. याशिवाय बियांमध्ये असलेले विद्रव्य आणि अघुलनशील फायबर वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
वजन नियंत्रणात राहिल्यास तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांपासून सुरक्षित राहता आणि तुम्हाला उच्च रक्तदाब होण्याची शक्यताही कमी असते. याचा तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होत नाही.
बदाम आणि अक्रोडामुळे हृदय निरोगी राहते (Almonds)
बदाम आणि अक्रोडाचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळतात, याची रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी रक्तदाब नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे.
चिया बियांचे सेवन (Chia seed)
चिया बियांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, मँगनीज, सेलेनियम, तांबे, लोह आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. बियांमधील हे घटक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे घटक मानले जातात. याशिवाय रोज सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत चिया बियांचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास याची मदत होते.
सोया प्रथिनेयुक्त आहार (Soya Protein)
सोया प्रथिने युक्त आहार ट्रायग्लिसराइड्स कमी करू शकतो. यामुळे हृदयविकार टाळण्यास मदत होते. सोया प्रोटीनमुळे हृदय मजबूत आणि निरोगी राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता कमी होते तसेच, तुमचे हृदय निरोगी राहते.
पालेभाज्या हृदयासाठी फायदेशीर (green leafy vegetables)
हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, नायट्रेट्स, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने शरीराला शक्ती मिळते. त्याचबरोबर यामध्ये असलेले फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचे काम करते. शरीरात असणारे खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या अनेक आजारांना आमंत्रण देते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.