Feng Shui Tips| Elephant | Feng Shui Tips for Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Feng Shui Tips: घरात हत्तीची मूर्ती ठेवल्यास तुम्हाला मिळतील अद्भूत फायदे

वास्तुशास्त्रातही हत्तीला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. फेंगशुईमध्येही हत्तीला विशेष महत्त्व आहे.

दैनिक गोमन्तक

Feng Shui Tips for Home: फेंगशुईनुसार काही गोष्टी घरात ठेवल्याने घरातील सदस्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. फेंगशुईमध्ये सांगितलेल्या या गोष्टी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंद आणतात. हत्ती हा त्यापैकीच ए आहे. वास्तुशास्त्रातही हत्तीला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. फेंगशुईमध्येही हत्तीला विशेष महत्त्व आहे.

फेंगशुई हत्तीला (Elephant) असामान्यतः यशाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की हे ठेवल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. हा हत्ती घरी किंवा ऑफिसमध्ये (Office) ठेवणे खूप शुभ मानले जाते. चला जाणून घेऊया घरात हत्तीची मूर्ती ठेवण्याचे काय फायदे होतात.

  • हत्तीची मूर्ती घरात ठेवण्याचे फायदे

हत्ती हे गणपतीचे रूप मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात (Home) हत्तीची मूर्ती असेल त्या घरातील सदस्यांवर गणपतीची कृपा राहते. फेंगशुईनुसार हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने घर सुरक्षित राहते. घराच्या मुख्य दरवाजावर ठेवणे खूप शुभ मानले जाते. नि:संतान जोडप्याने त्यांच्या बेडरूममध्ये दोन हत्तींच्या मूर्ती ठेवाव्यात.

असे मानले जाते की यामुळे लवकरच संततीचे सुख प्राप्त होते. हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि धनाचा (Money) प्रवाह कायम राहतो. तुम्हाला जीवनात आनंद, सन्मान आणि यश हवे असेल तर नवीन वर्षात हत्तीची सोंड असलेली मूर्ती घरी आणा. 

  • फेंगशुईमध्ये हत्ती ठेवण्याचे नियम

फेंगशुई हत्ती खरेदी करण्यासाठी आणि ठेवण्यासाठी काही खास नियम आहेत. काळ्या रंगाचा फेंगशुई हत्ती कधीही खरेदी करू नका कारण हा रंगाचा हत्ती शुभ परिणाम देत नाही.

पांढऱ्या रंगाचा हत्ती घरात ठेवल्याने घरातील वातावरण चांगले राहते. हत्ती नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावा. फेंगशुई हत्तीची जोडी घरात ठेवल्यास त्यांचे चेहरे एकमेकांकडे असावेत. ते मागील बाजूस ठेवल्याने नकारात्मक परिणाम होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT