Feng Shui Tips For New Year 2024 
लाइफस्टाइल

New Year 2024: नवं वर्ष आनंदी घालवण्यासाठी फेंगशुईच्या 'या' टिप्स करा फॉलो

चिनी वास्तुशास्त्र म्हणजेच फेंगशुई घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवते.

Kavya Powar

Feng Shui Tips For New Year 2024: नवीन वर्षासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती नवीन वर्षात आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शुभ होवो यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी चिनी वास्तुशास्त्र म्हणजेच फेंगशुई घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवते.

फेंगशुईनुसार, जर तुमचे जीवन अनेक समस्यांनी घेरले आहे, तर तुम्ही फेंगशुईमध्ये सांगितलेले काही सोपे उपाय देखील करून पाहू शकता आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर मात करू शकता. या उपायांबद्दल जाणून घेऊया.

जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल आणि पैशाची कमतरता तुमचा आनंद हिरावून घेत असेल तर तुमच्या घरात बांबूचे रोप लावा. फेंगशुईच्या मान्यतेनुसार, बांबू संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते.

घराच्या दिवाणखान्याच्या दक्षिण-पूर्व दिशेला फेंगशुई बेडूक ठेवल्याने व्यक्तीला पैशाची कमतरता भासत नाही. हे घरी ठेवल्याने सौभाग्य वाढते आणि करिअरमध्येही प्रगती होते.

घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवा. फेंगशुईच्या मान्यतेनुसार लाफिंग बुद्धाला नियमानुसार ठेवल्यास त्याचा परिणाम लवकर दिसून येतो.

जर सतत मेहनत करूनही तुमची नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल तर यासाठी तुम्ही घरात एक सुंदर विंड चाइम लावा. यामुळे व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. माणसाला प्रगतीचा नवा मार्ग सापडतो.

व्यवसायात प्रगती करायची असेल तर लाफिंग बुद्धाची मूर्ती कामाच्या ठिकाणी दोन्ही हात वर करून ठेवा. हे फेंगशुई उपाय लवकरच व्यवसायात नफा मिळवून देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT